Wednesday, December 29, 2021

खळखळून हसत करू या नव्या वर्षाचं स्वागत! - महाराष्ट्राची हास्यजत्रा, न्यू इयर स्पेशल! 31 डिसेंबर, रात्री 9 वा. आपल्या सोनी मराठीवर

 खळखळून हसत करू या नव्या वर्षाचं स्वागत! - महाराष्ट्राची हास्यजत्रा, न्यू इयर स्पेशल!

31 डिसेंबर, रात्री 9 वा. आपल्या सोनी मराठीवर.

 

वर्षभर अवघ्या महाराष्ट्राला हसवणारी हास्यजत्रा नव्या वर्षाचं स्वागतही  प्रेक्षकांच्या मनोरंजनी करणार आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रान्यू इयर स्पेशल कार्यक्रम प्रेक्षकांना 31 डिसेंबरला रात्री 9 वासोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहेखासदार सांस्कृतिक महोत्सवनागपूर इथं या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यात आलंहास्यजत्रेच्या कलाकारांना बघण्यासाठी नागपूरकरांनी चांगलीच गर्दी केली होती. 'ही गर्दी नायनागपूरकरांचं प्रेम हाय', असं अभिवादन प्राजक्ता माळी हिनी खास वऱ्हाडी शैलीत केलंथेट पण मनानं निर्मळसुरात  बोचणारा रांगडेपणामहाराष्ट्रात कार्य  जगभरात हवा करणाऱ्या लोकांचं शहर असलेल्या नागपुरात आल्यावर माहेरी आल्यासारखं वाटतंअसं सई ताम्हणकर म्हणाली.

 

या कार्यक्रमात समीर चौगुलेविशाखा सुभेदारअरुण कदमप्रसाद खांडेकरनम्रता आवटेगौरव मोरेओंकार भोजनेवनिता खरात आणि हास्यजत्रा चमू यांनी नागपूरकरांना खळखळवून हसवलं! 'महाराष्ट्राची हास्यजत्राया कार्यक्रमाचे परीक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर आणि सूत्रसंचालन करणारी प्राजक्ता माळी यांनी खास वऱ्हाडीत रसिकांशी संवाद साधलाछत्रपती शिवाजी महाराजांची सून आणि विदर्भाची कन्या ताराराणी हिच्यावर आधारित नाट्यप्रवेश या वेळी सादर करण्यात आलामंचावरील या ताराराणीने 'हर हर महादेव'चा गजर करताच उपस्थित प्रेक्षकांनीही तिच्या सुरात सूर मिसळला.

 

'इंडियन आयडल मराठीया कार्यक्रमातील सध्या गाजत असलेले गायक कैवल् केजकरजगदीश चव्हाणभाग्यश्री टिकले यांनी कार्यक्रमात विविध गीतं सादर केली.

 

'अजूनही बरसात आहे', 'स्वराज्यसौदामिनी ताराराणी', 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेतल्या कलाकारांनीउमेश कामतमुक्ता बर्वेस्वरदा थिगळे आणि मधुरा वेलणकर यांनीया वेळी उपस्थित राहून प्रेक्षकांशी सवांद साधला.

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह डॉविलास डांगरेरास्वसंघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरेमहानगर संघचालक राजेश लोयाउपायुक् पखालेकांचन गडकरीवरिष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडेगजानन निमदेवसंदीप भारंबेहॉटेल अशोकचे सीएमडी संजय गुप्तादीपेन अग्रवालसत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे या वेळी प्रामुख्याने उपस्थित होतेकार्यक्रमाचं संचालन रेणुका देशकर यांनी केलेप्राअनिल सोले यांनी प्रास्ताविक केले.

 

हा संपूर्ण सोहळा 31 डिसेंबरला रात्री 9 वासोनी मराठीवर पाहता येणार आहेपाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रान्यू इयर स्पेशल - 31 डिसेंबररात्री 9 वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...