Wednesday, December 29, 2021

अंकुश आणि प्राजक्तानी घातलाय 'चायनीज गोंधळ'


करोनाच्या विळख्यात सगळेच कंटाळले होते. याच विळख्यातुन आता आपण बाहेर पडत आहे. बाहेर पडत असताना करोनापासून सरंक्षण करायला आणि त्याच सावट लवकरात लवकर दूर करायला अंकुश आणि प्राजक्ताने एक वेगळीच शक्कल लढवली आहे.


   ही शक्कल म्हणजे त्यांनी घातलाय चायनीज गोंधळ
आता हा चायनीज गोंधळ म्हणजे त्यांच्या आगामी 'लकडाऊनया चित्रपटांच्या 'च्यावम्यावया गाण्याच्या निमित्ताने त्यांनी देवाकडे आपल्यावरील हे संकट दुर व्हावं म्हणून गाऱ्हाणं घातलं आहे. नुकतंच हे गाणं आपल्या भेटीला आलं आहे . चीनच्या एका चुकीमुळे संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागले आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून त्यांना संदेश देणारा असा हा पहिला 'इंटरनॅशनल गोंधळआहे. हा गोंधळ रविंद्र मठाधिकारी याने शब्दात उतरवला असून त्याला संगीतबद्ध अविनाश विश्वजित या संगीत दिग्दर्शक जोडीने केलंय. आदर्श शिंदे,  विश्वजित जोशी आणि मैथिली पानसे जोशी या गायकाच्या सुरांनी हा गोंधळ सजला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टी घडल्या आणि त्याचे परिणाम ही आपण पाहिले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांची लग्न रखडली आणि अनेकांची झाली पण ते सगळेच जिथे होते तिथे अडकले तर अशाच एका लग्नाची गोष्ट 'लकडाऊनसांगत आहे. लॉकडाऊनच्या मध्ये एका लग्न घरात नेमकं काय काय घडलं असेल याच चित्रण या चित्रपटात आहे. तर या च्यावम्याव या गोंधळाने प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेली कुणकुण मजेशीर रित्या शब्दात आणि सुरात एकत्र बांधली गेली आहे. या गोंधळाच्या निमित्ताने नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकरच्या तालावर अंकुश आणि प्राजक्ता नाचत असून धनंजय कुलकर्णी यांच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून हा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो. २८ जानेवारी ला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणेदर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश - विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मितीची धुरा स्मिता खरात यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली असून चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...