Wednesday, December 8, 2021

छगन भुजबळ यांनी 'जिंदगानी' चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण करत दिल्या चित्रपटाला शुभेच्छा.


मराठी चित्रपट हा नेहमीच प्रगल्भ राहिला असून मराठी चित्रपटातुन मांडण्यात येणारे विषय हे नेहमीच समाजाला आरसा दाखवत आले आहेत. चित्रपटाचा विषय हा त्याला त्याचा प्रेक्षक मिळवून देत असतो. असाच एक सामाजिक विषय मांडणारा चित्रपट म्हणजे 'जिंदगांनी'

नाशिक येथे चालू असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या चित्रपटाचे पोस्टरचे सन्माननीय कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आल. जिंदगानी च्या या पोस्टर अनावरण सोहळ्यात छगन भुजबळ म्हणाले 'एका वेगळ्या विषयाचा आणि वेगळ्या आशयाचा हा चित्रपट असूनअनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात याचा गौरव झाला आहे. नाशिकचे स्थानिक कलाकार आणि येथीलच तंत्रज्ञ यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. त्याचा गौरव करण्यासाठी हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन सगळ्यांनी बघायला हवा'. तर या पोस्टर अनावरण सोहळ्यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली असून हा चित्रपट येत्या फेब्रुवारी मध्ये ११ तारखेला प्रदर्शित होत आहे.                     बदलणाऱ्या काळात आपण सुद्धा बदलत असलो तरी आपलं मूळ हे नेहमीच लक्षात ठेवायचं असा संदेश देणाऱ्या या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन विनायक साळवे यांनी तर निर्मिती सुनीता शिंदे यांनी नर्मदा सिनेव्हिजन्स या निर्मिती संस्थे मार्फत केली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रयोगशील नट म्हणून ओळखले जाणारे शशांक शेंडे तर नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे हे कलाकार आहेत. तर अभिनेत्री सविता हांडेसुष्मा सिनलकरस्मिता प्रभूसायली पाटीलअभिनेते विनायक साळवेप्रदिप नवलेगणेश सोनवणेप्रथमेश जाधवरवि साळवेसागर कोरडेसंजय बोरकरदिपक तावरेपांडुरंग भारती हे कलाकार या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. विजय गवंडे यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. तर चित्रपटातील गाणी अजय गोगावलेआदर्श शिंदेबेला शेंडेराधिका अत्रेअमिता घुगरी यांच्या सुरमधुर स्वरांनी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.


 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...