Tuesday, June 20, 2023

चेतासंस्थेच्या दुर्मिळ आजारावर ७ वर्षीय चिमुकल्याने केली मात

   चेतासंस्थेच्या दुर्मिळ आजारावर ७ वर्षीय चिमुकल्याने केली मात

न्यू ऑनसेट रिफ्रॅक्टरी स्टेटस एपिलेप्टिकसच्या (एनओआरएसई) दुर्मिळ आजारावर अपोलोत केले प्रगत उपचार



 नवी मुंबईतील अपोलो प्रगत बहु-वैशिष्ट्ये असलेले वैद्यकीय उपचार पुरवणाऱ्या रुग्णालयाने एका सात वर्षे वयाच्या मुलावर न्यू ऑनसेट रिफ्रॅक्टरी स्टेटस एपिलेप्टिकसच्या (एनओआरएसई) दुर्मिळ व आव्हानात्मक प्रकरणाच्या यशस्वी उपचाराची घोषणा करून प्रगत पेडियाट्रिक न्यूरोलॉजीबाबत रुग्णालयाची वचनबद्धता प्रदर्शित केली. वारंवार, असह्य झटके येणे, खूप जास्त झोप येणे, दोन दिवसांपासून सतत ताप आल्यामुळे आणि स्थानिक रूग्णालयात केलेल्या सुरुवातीच्या चाचण्यांमधून काहीच निष्पन्न न झाल्याने निदान आणि सर्वसमावेशक उपचारांसाठी त्याला अपोलो हॉस्पिटल्समध्ये तातडीने हलवले. एमआरआय ब्रेन इमेजिंग आणि सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (सीएसएफ) चाचणीसह, रुग्णाच्या व्यापक चाचण्या केल्या गेल्या, ज्यातून एन्सेफेलायटिसची (मस्तिष्कशोथ) उपस्थिती उघड झाली आणि एनओआरएसईच्या निदानाची पुष्टी झाली. या उपचारामध्ये अपस्मारविरोधी अनेक औषधे, इन्फ्युजन औषधे आणि गंभीर स्थितींमध्ये व्हेंटिलेटर लावून काळजी घेणे यांचा समावेश केला होता. दीर्घकालीन काळजीमध्ये फेफरे येणे नियंत्रित करण्यासाठी केटोजेनिक आहार आणि दाहक पॅथोफिजियोलॉजीचे नियमन करण्यासाठी स्टिरॉइड्सचा समावेश होतो. या संपूर्ण काळात, मुलाच्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले, ज्यामध्ये अत्याधुनिक फेफरे शोधून काढणे आणि अपस्मारविरोधी औषधे देणे यावर भर दिला.


डॉ. अभिजित बागडे, बालरोगतज्ज्ञ सल्लागार-इन्टेन्सिविस्ट, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,“न्यू ऑनसेट रिफ्रॅक्टरी स्टेटस एपिलेप्टिकस (एनओआरएसई) ही चेतासंस्थेची एक दुर्मिळ, गंभीर स्थिती आहे जी लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकते. प्रौढांमध्ये याचा मृत्यू दर १६-२७% असून चेतासंस्थेची लक्षणीय दीर्घकालीन अवशिष्ट लक्षणे आहेत. या स्थितीवर अनेकदा आक्रमक हस्तक्षेप करावा लागतो आणि चेतासंस्थेचे संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी आणि जगण्याचा दर सुधारण्यासाठी वेळेवर, सर्वसमावेशक व्यवस्थापन महत्त्वाचे असते. आम्ही वेळेत स्थितीचे निदान करू शकलो आणि मुलावर यशस्वी उपचार करू शकलो याचा आम्हाला आनंद वाटतो.”


फिजिओथेरपी आणि पुनर्वसन केंद्र, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे प्रभारी डॉ. शालुशुभम केणी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे मानसशास्त्र सल्लागार डॉ. रितुपर्णा घोष, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या वरिष्ठ चिकित्सिय आहारतज्ज्ञ कु. वर्षा गोरे हे देखील चिकित्सिय संघाचा भाग होते. संघाच्या सखोल काळजी आणि काटेकोर व्यवस्थापनाचा परिणाम सकारात्मक झाला. फिजिओथेरपी, इष्टतम पोषण आणि समुपदेशन यांचा समावेश करून सुमारे एक महिना उपचार केले गेले आणि त्यानंतर मुलाला दैनंदिन जीवनातील सर्व गोष्टी स्वतंत्रपणे करण्यासाठी रुग्णालयातून सोडण्यात आले.


श्री संतोष मराठे, प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी -पश्चिम क्षेत्र, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले,"डॉक्टरांच्या कर्तृत्वाचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे आणि आमचे प्राथमिक लक्ष आमच्या रुग्णांची बारकाईने काळजी घेणे आणि व्यावसायिक कौशल्याने सेवा देणे यावर आहे. अपोलोकडे सर्वसमावेशक बालरोग विभाग आहे ज्यामध्ये चेताविज्ञान, जेनेरिक औषध आणि गंभीर काळजी सेवांमध्ये प्रदान केलेल्या अद्वितीय सेवांसह १७ उप-विशेषता आहेत. या आव्हानात्मक प्रकरणात बहु-अनुशासनात्मक संघाचा यशस्वी दृष्टीकोन हेच स्पष्ट करतो की एकात्मिक काळजीमुळे दुर्मिळ आणि गंभीर आजारांच्या बाबतीतही कसे सकारात्मक परिणाम मिळू शकतात.”

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...