Saturday, June 3, 2023

सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांच्याबरोबर रंगणार 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग.

                                                        सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांच्याबरोबर रंगणार 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग.

पाहा, 'कोण होणार करोडपतीविशेष जून शनिवार रात्री  वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


                              जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्यया आठवड्यात ‘कोण होणार करोडपतीमध्ये शनिवारच्या ‘विशेष भागातसचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर हॉट सीटवर येणार आहेतदीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेसाठी सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतया पर्वातील हा पहिला विशेष भाग असणार आहे आणि या भागात सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांच्याशी गप्पा रंगणार आहेतया बाप-लेकीबरोबर  रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास असणार आहेत्याशिवाय 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर दोन सचिन एकत्र असतीलतेही नक्कीच गमतीदार असेल. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार चिरतरुण व्यक्तिमत्त्व सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर.

                          चित्रपट सृष्टीत तब्बल ६० वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते सचिन पिळगांवकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत.सचिन पिळगांवकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय अभिनेतेत्यांनी त्यांच्या अभिनयाचे ठसे त्यांच्या बालपणापासूनच उमटवले आहेततसेच श्रिया सुद्धा मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत नावलौकिक आघाडीची अभिनेत्री आहेचित्रपटांसोबतच काही गाजलेल्या वेब मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आजवर आलीश्रियाकडून आपल्या बाबांविषयीचे काही गमतीदार किस्से प्रेक्षकांना पाहायला/ऐकायला मिळणार आहेतसचिन खेडेकर यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी उलगडल्या जाणार आहेतसचिन पिळगांवकर म्हणले कीत्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी  वकिलाची भूमिका कधीच केली नाहीपण श्रियाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ही वकिलाच्या भूमिकेपासूनच केलीसचिन पिळगांवकर मंचावर आहेत आणि गाणे सादर होणार नाहीहे शक्य नाही. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर त्यांनी श्रियाबरोबर गाणेही  सादर केले आणि 'कोण होणार करोडपती'चा मंच काही काळासाठी संगीतमय झाला.

 

'कोण होणार करोडपती'च्या खेळाबरोबरच सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका,

'कोण होणार करोडपतीविशेष जून,  शनिवारी रात्री  वाजता,फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...