Friday, June 30, 2023

जुन्या काळातील नामवंत अभिनेत्री आशा नाडकर्णी काळाच्या पडद्याआड

 जुन्या काळातील नामवंत अभिनेत्री आशा नाडकर्णी काळाच्या पडद्याआड

व्हि.शांताराम यांनी त्यांचे चित्रपटातील नाव 'वंदना' ठेवले होते



रुपेरी पडद्यावर आलेले काही चेहरे प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवतात. आशा नाडकर्णी या अभिनेत्रीचा प्रभाव याच स्वरुपाचा होता. प्रख्यात दिग्दर्शक व्हि. शांताराम यांनी 'मौसी' या चित्रपटात आशाजी ना प्रथम अभिनेत्रीच्या रुपात काम दिले जेव्हा त्या फक्त १५ वर्षांच्या होत्या. त्यांनी ह्या संधीचे सोने केले आणि नंतर 'नवरंग' सारखे अनेक चित्रपट केले. व्हि.शांताराम यांनी त्यांचे चित्रपटातील नाव 'वंदना' ठेवले होते.



आशा नाडकर्णी मुळच्या सामान्य कुटुंबातील, पुण्यातील सोमवार पेठ येथील सारस्वत कॉलनी मध्ये सुरवातीला राहत होत्या. त्यांचे कुटुंब १९५७ ला मुंबई मध्ये रहावयास आले आणि तेव्हा पासून त्यानी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्या उत्तम नर्तिका देखील होत्या १९५७ ते १९७३ ह्या कालावधीत त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपट केले. अशा गुणी कलाकारचे नुकतेच १९ जून २०२३ रोजी मलबार हिल, दक्षिण मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले. निधनाची बातमी त्यांचे सुपुत्र यांनी माध्यमास कळवली निधनाच्या वेळी त्यांचे वय ८० वर्षे होते गेली कित्येक वर्षे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या आणि डायलिसिसवर होत्या त्यांच्या मागे त्यांचा मुलगा,सून व नातू असा परिवार आहे.



आशा नाडकर्णीच्या काही गाजलेल्या चित्रपटांची यादी खालील प्रमाणे :

 

·       नवरंग - दिग्दर्शक व्हि.शांताराम 1959 - आशा नाडकर्णी,संध्या, निर्मलकुमार

·       गुरु और चेला - दिग्दर्शक चांद 1973 - ज्योती, शेख मुख्तर, आशा नाडकर्णी

·       चिराग - दिग्दर्शक रवि खोसला 1969 - आशा पारेख, सुनील दत्त, आशा नाडकर्णी, सुलोचना

·       फरिश्ता- दिग्दर्शक केदार कपूर 1968 - देव कुमार, आशा नाडकर्णी, निवेदिता जहागिरदार

·       श्रीमानजी - दिग्दर्शक राम दयाल 1968 - किशोर कुमार, आशा नाडकर्णी, शाहिदा

·       दिल और मोहब्बत- दिग्दर्शक आनंद दत्ता 1968 - जाॅय मुखर्जी, शर्मिला टागोर, आशा नाडकर्णी, जाॅनी वाॅकर

·       अल्बेला मस्ताना - दिग्दर्शक बी.जे.पटेल 1967 - किशोर कुमार, आशा नाडकर्णी, भगवान, अरुणा ईराणी

·       बेगुनाह - दिग्दर्शक शिव कुमार 1970 - शेख मुख्तार, आशा नाडकर्णी

·       श्रीमान बाळासाहेब - दिग्दर्शक दत्ता चव्हाण 1964 - राजा गोसावी,आशा नाडकर्णी

·       क्षण आला भाग्याचा - दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी 1962 - राजा गोसावी,आशा नाडकर्णी

·       मानला तर देव - दिग्दर्शक दत्ता चव्हाण 1970 - काशिनाथ घाणेकर, आशा नाडकर्णी

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...