मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले, 'कोण होणार करोडपाती'च्या मंचावर.
पाहा 'कोण होणार करोडपती' विशेष भाग - १ जुलै, शनिवारी रात्री ९ वाजता,फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर
प्रशांत दामले आणि कविता लाड हे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर व्यक्त झाले. प्रशांत दामले काही ठरावीक नाट्यगृहांत प्रयोग का करत नाहीत, याबद्दल त्यांनी सांगितले. प्रशांत दामले यांनी मोरूची मावशी नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगितला. सुरुवातीला १६१ प्रयोग होईपर्यंत हे नाटक रंगभूमीवर विशेष गाजले नव्हते. त्यानंतर दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी त्यातील गाणे सादर केले. ते गाणे प्रेक्षकांना इतके आवडले की त्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यापुढील आजपर्यंतचे सगळे प्रयोग हाऊसफूल गेले, अशी आठवण प्रशांत दामले यांनी सांगितली. कविता लाड यांनी प्रशांत दामले यांच्या कामाचे फार कौतुक केले. त्यांच्यासारखा नट रंगभूमीवर सतत काम करतो आहे, त्यामुळे सगळ्यांनाच कामाचा हुरूप येतो. प्रशांत दामले आणि कविता लाड यांनी भरपूर वर्षे एकत्र काम केले आहे. आजवरच्या कारकिर्दीत झालेल्या अनेक आठवणी आज या मंचावर उलगडणार आहेत. अनेक नाटकांदरम्यान झालेले किस्से आणि आठवणी प्रेक्षकांना ऐकायला मिळतील आणि ते किस्से आणि त्या आठवणी प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. मराठी रंगभूमीवरील हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या सहभाग असलेला 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग १ जुलै रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. जिंकलेली रक्कम ते अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेस देणार आहेत. आता अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेसाठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात ते किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
पाहा
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST