Thursday, June 8, 2023

परेश रावल आणि विजय केंकरे यांच्याबरोबर रंगणार 'कोण होणार करोडपती

 परेश रावल आणि विजय केंकरे यांच्याबरोबर रंगणार 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग.

पाहा, 'कोण होणार करोडपतीविशेष१० जूनशनिवारी रात्री  वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


                    जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्यया आठवड्यात ‘कोण होणार करोडपतीमध्ये शनिवारच्या ‘विशेष भागातपरेश रावल आणि विजय केंकरे हॉट सीटवर येणार आहेतह्युमॅनिटेरिअन एड फाउंडेशन या संस्थेसाठी परेश रावल आणि विजय केंकरे 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतमागील विशेष भागात श्रिया आणि सचिन पिळगांवकर या बाप-लेकीच्या जोडीने हजेरी लावली होतीया आठवड्यातील विशेष भागात परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र हॉट सीटवर बसणार आहेतपरेश रावल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचे आवडते कलाकारत्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्याबाबूराव गणपतराव आपटे ही व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडलीमराठीबरोबर त्यांचे सुरुवातीपासूनच अनोखे नाते जोडले गेले आहेमराठी भाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम  अनोखे नाते आपल्याला कोण होणार करोडपतीच्या या विशेष भागात पाहायला मिळेलमराठी वहिनींच्या इतिहासात परेश रावल पहिल्यांदा एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहेतत्यांची आजवर गाजलेल्या मराठी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या.

 
                    चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते परेश रावल 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतत्यांच्याबरोबर हॉट सीटवर असणार आहेत मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते विजय केंकरेनाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊनज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलींतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे विजय केंकरे यांनी नुकतेच मराठी सृष्टीतील आपले शंभरावे नाटक प्रेक्षकांच्या समोर आणलेपरेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र येऊन ह्युमॅनिटेरिअन फाउंडेशन एड या संस्थेसाठी 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतया विशेष भागात या दोघांच्या गप्पांची मैफल नक्कीच जमेलमराठी रंगभूमीचित्रपटसृष्टीत्या दोघांचा सिनेसृष्टीतील सुरुवातीचा काळ या सगळ्या विषयांवर या भागात गप्पा रंगल्याप्रेक्षकांसाठी हा भाग म्हणजे पर्वणीच ठरेल 

 

  'कोण होणार करोडपती'च्या खेळाबरोबरच परेश रावल आणि विजय केंकरे यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका,

'कोण होणार करोडपतीविशेष१० जूनशनिवारी रात्री  वाजता,फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...