Tuesday, June 20, 2023

अभिनेता अजिंक्य राऊतचं टेलिव्हिजनवर कमबॅक!!! नवी मालिका - 'अबोल प्रीतीची अजब कहाणी'. १७ जुलैपासून, सोम. ते शनि., संध्या.७.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

अभिनेता अजिंक्य राऊतचं टेलिव्हिजनवर कमबॅक!!!

नवी मालिका - 'अबोल प्रीतीची अजब कहाणी'.

१७ जुलैपासूनसोमते शनि., संध्या..३० वासोनी मराठी वाहिनीवर.



  निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतेत्यांतील आगळेवेगळे विषय कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतातमालिकेतील काही व्यक्तिरेखा कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहताततशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. 'अबोल प्रीतीची अजब कहाणीही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहेत्याची पहिली झलक नुकतीच पाहायला मिळते आहेप्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या मालिकेतून टेलिव्हिजनवर कमबॅक करतो आहेत्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट हीसुद्धा या मालिकेतून विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते आहेतर आता ही 'अबोल प्रीतीची अजब कहाणीलपूनछापून कशी फुलतेय हे नक्कीच पाहायला मिळेल.

                         अभिनेता अजिंक्य राऊत पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत्याचे या आधीचे काम प्रेक्षकांना विशेष आवडलेत्याच्या नव्या भूमिकेची त्याचे चाहते मनापासून वाट पाहत होतेअजिंक्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेतून दिसणार आहेमालिकेचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना विशेष आवडतो आहे कारण मालिकेची नायिका जान्हवी तांबट ही वेगळ्या रूपात दिसते आहेती चक्क एका बॉडीगार्डच्या वेशात आपल्याला दिसते आहेतेही पुरुष बॉडीगार्डच्या वेशातआता हा बॉडीगार्ड कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईलहे पाहणे उत्सुकतेचे असेलया मालिकेत अजून कोण कलाकार असतील आणि एकंदर मालिका कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईल याची प्रेक्षक वाट बघताहेतही मालिका १७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

                       पाहायला विसरू नका नवी मालिका - 'अबोल प्रीतीची अजब कहाणी'. १७ जुलैपासूनसोमते शनि., संध्या.३० वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...