Sunday, June 18, 2023

जिओ मामीमध्ये दक्षिण आशियातून ३०० सिनेमांच्या प्रवेशिका

                                                जिओ मामीमध्ये दक्षिण आशियातून ३०० सिनेमांच्या प्रवेशिका

 

                                           जिओ मामीमध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण आशियातून ३०० सिनेमांच्या प्रवेशिका,                                                                                     प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२३ 


दक्षिण आशियातील नव्या सिनेमांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जिओ मुंबई फिल्म फेस्टिव्हलचे प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन, दक्षिण आशियाई गुणवत्तेचे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट

भारतातील सर्वात लोकप्रिय फेस्टिव्हल्सपैकी एक जिओ मामी (मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज) मुंबई फिल्म फेस्टिव्हल २०२३ २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान मुंबईत भरवला जाणार आहे. यंदाचा सोहळा आणखी भव्य करण्यासाठी जिओ मामीने दक्षिण आशियाई सिनेमा व गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा फेस्टिव्हल दक्षिण आशिया, तेथील समाज आणि आंतरराष्ट्रीय सिनेमातील सर्वोत्तम प्रवाह दाखवणार असून त्याचबरोबर स्वतंत्र आणि उदयोन्मुख दिग्दर्शकांना वाव दिला जाणार आहे. जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलने सिनेमा क्षेत्रातील नवे प्रवाह दर्शवण्यासाठी, संकल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी, एकमेकांना सहकार्य करण्यासाठी, व्यावसायिक संधींचा लाभ घेण्यासाठी नवी यंत्रणा उभारण्याचे ठरवले आहे. त्याचसाठी सिनेमातील सर्वोत्तम आशय मुंबईत उपलब्ध करून दिला जाणार आहे.

भारतातील बहुप्रतीक्षित फिल्म फेस्टिव्हल्सपैकी एक असलेल्या जिओ मामीमध्ये जगभरातील सिनेमाप्रेमी व गुणवान कलाकार सहभागी होत असतात. फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेली प्राथमिक मुदत ३१ मे रोजी संपली असली, तरी आता ती ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. आतापर्यंत २९४ प्रवेशिका आल्या असून ही संख्या वाढेल असा अंदाज आहे. आतापर्यंत आलेल्या वैविध्यपूर्ण प्रवेशिकांच्या संख्येवरून भिन्न संस्कृती, प्रवाह आणि आशय असलेले सिनेमे निवडून सर्वांपुढे आणण्याची फेस्टिव्हलची बांधिलकी दिसून येते. जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिवहल २०२३ चा अनुभव सिनेप्रेमी, या क्षेत्रातील व्यावसायिक तसेच दिग्दर्शकांसाठी अनोखा असेल.

याविषयी फेस्टिव्हलच्या संचालक अनुपमा चोप्रा म्हणाल्या, प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन केल्यापासून फक्त १५ दिवसांत इतक्या प्रवेशिका येणे उत्साहवर्धक आहे. खरे स्टार्स असलेल्या लोकांच्या सहभागामुळेच हा फेस्टिव्हल आणखी खास ठरतो. भारतातील सिनेप्रेमी उत्सुकतेनं या फेस्टिव्हलची वाट पाहात असतात. आम्ही सिनेमा क्षेत्रातील नवे आणि धाडसी प्रवाह, सांस्कृतिक बारकावे, वैविध्यपूर्ण कथाकथन आणि प्रतिनिधीत्व यांना महत्त्व देतो. दक्षिण आशिया, दक्षिण आशियाई समाज आणि आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांचे सिनेमे दाखल करून घेण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही कायमच स्वतंत्र सिनेमे व दिग्दर्शकांना आपले काम सादर करण्यासाठी व्यासपीठ पुरवले आहे. त्यांना इतरांबरोबर नेटवर्किंग करत सिनेमाबरोबर प्रवास करण्यासाठी मदत केली आहे. सर्व प्रकारचे सिनेमे आणि दिग्दर्शकांचे आम्ही स्वागत करतो. सिनेमा विश्वातील नवे, वेगळे विचार जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

जिओ मामी मुंबई फेस्टिवलने दक्षिण आशियावर लक्ष केंद्रित केल्याने फेस्टिवल तसेच कलाकार- तंत्रज्ञांसाठी नवे विश्व खुले होणार आहे. फेस्टिवलमध्ये सहभागी होत असलेल्या दिग्दर्शकांना त्यांच्या कामाच्या सर्वोत्तम पद्धतींची माहिती देण्याची, कार्यशाळांमध्ये उपस्थित राहाण्याची, सिनेमा निर्मितीच्या प्रक्रियेबाबत नव्या कल्पनांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळेल. यानिमित्ताने त्यांना सर्व सीमा पार करून खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर उतरता येईल. सिनेमा माध्यमाप्रती वेगळा आणि कल्पक दृष्टीकोन मांडण्यासाठी बांधील असलेले जिओ मामी मुंबई फेस्टिवल सिनेमा क्षेत्रातल्या पारंपरिकतेला आव्हान देणाऱ्या, नवी समीकरणे प्रस्थापित करणाऱ्या दिग्दर्शकांना व्यासपीठ मिळवून देते.

दक्षिण आशियावर लक्ष केंद्रित करण्याविषयी जिओ मामी मुंबई फेस्टिवलच्या आर्टिस्टिक डिरेक्टर दीप्ती डीकुन्हा म्हणाल्या, यावर्षी आम्ही फेस्टिवलचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. भारतीय सिनेमे व दिग्दर्शकांबरोबरच दक्षिण आशियाई गुणवत्ता शोधण्यावर भर दिला जाणार आहे. दक्षिण आशिया आणि दक्षिण आशियाई दिग्दर्शक खूप चांगले काम करत आहेत. एक फेस्टिवल म्हणून त्यांचे सिनेमे मुंबईतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा सन्मान आहे. जिओ मामीने नवीन दक्षिण आशियाई गुणवत्ता शोधण्याचे, त्यांचा विकास करण्याचे व स्वतंत्र सिनेमा निर्मितीला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. या फेस्टिवलमध्ये प्रस्थापित सिने कलाकारांच्या गुणवत्तेची दखल घेतली जाते. त्यामुळे तुम्ही अनुभवी दिग्दर्शक असाल किंवा नवीन सुरुवात करत असाल, तुमचे काम दाखल करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. दिग्दर्शकांना फेस्टिवलमध्ये असामान्य अनुभव देण्यासाठी तसंच त्यांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. दक्षिण आशियाई दिग्दर्शकांना समकालीन सहकाऱ्यांबरोबर नाते जोडण्यासाठी व पर्यायाने कम्युनिटी तयार करण्यासाठीही मदत केली जाणार आहे.

सिनेमे दाखल करण्यासाठीची मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. जिओ मुंबई फिल्म फेस्टिवल दिग्दर्शकांना त्यांचे सिनेमे दाखवण्यासाठी, इतर दिग्दर्शकांबरोबर चर्चा करण्यासाठी व जागतिक पातळीवर नेटवर्क तयार करण्यासाठी मुबलक संधी देण्याचे आश्वासन देत आहे. दक्षिण आशियाई सिनेमा दाखवण्यासाठी सर्वात विश्वासार्ह भागीदार बनण्यसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याच प्रयत्नांतून यंदा सर्वोत्तम जागतिक सिनेमे प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिले जातील. तुमचा सिनेमा आजच दाखल करा. 

अधिक माहिती व सिनेमा दाखल करण्याच्या प्रक्रियेविषयी जाणून घेण्यासाठी लॉग ऑन करा -  www.mumbaifilmfestival.com.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

GLOBAL PRIDE OF SINDHI AWARDS 2024: A GLORIOUS CELEBRATION OF SINDHI HERITAGE

  GLOBAL PRIDE OF SINDHI AWARDS 2024: A GLORIOUS CELEBRATION OF SINDHI HERITAGE Awardees and guests- Ramesh Taurani, Ghanshyam Vaswani,Lille...