रविवार 28 जुलै 2019 रोजी जीटीडीसीचा मान्सून ट्रेक जाणार पाली धबधबा येथे
प्रेस रीलीज
रविवार 28 जुलै 2019 रोजी जीटीडीसीचा मान्सून ट्रेक जाणार पाली धबधबा येथे
पणजी, 23 जुलै
गोवा पर्यटन विकास महामंडळाने येत्या रविवारी म्हणजेच 28 जुलै 2019 रोजीआणखी एका धमाल, अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या ट्रेकचं आयोजन केलं आहे.
पाली येथील धबधब्याच्या ठिकाणी जाणार असलेल्या या चार किलोमीटर अंतराच्या ट्रेकदरम्याननिसर्गरम्य लँडस्केप्स पाहायला मिळतात. गावापासून या ठिकाणी जाण्यासाठी 60 ते 90 मिनिटेचालत जावे लागते. पालीचा धबधबा शिवलिंग धबधबा या नावानेही ओळखला जातो, कारण दगडांवरूनपडणारं पाणी शिवलिंगाप्रमाणे दिसते.
हा ट्रेक तुलनेने सोपा आणि तरीही साहसी आहे. वाटेत जंगलातून वाहाणारे झरे, विविध प्रकारचीफुलपाखरं आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. या ट्रेकदरम्यान काही ठिकाणी तीव्र चढ तसेचनिसरड्या खडकांचं वर्चस्व आहे.
तेव्हा तुमची ट्रेकिंग बॅग भरा आणि या सोप्य तरीही साहसी ट्रेकदरम्यान निसर्गाची जादूअनुभवण्यासाठी चला.
हा ट्रेक सर्वांसाठी विशेषतः साहस आणि निसर्गप्रेमींसाठी खुला आहे.
वाहतुकीची सोय म्हापसा रेसिडेन्सी रेसिडेन्सीपासून सकाळी 7.30 आणि मडगाव रेसिडेन्सीपासून 7.15वाजता, तर पणजी येथून सकाळी 8.30 वाजता करण्यात आली आहे. जुना गोवा, बाणस्थरी आणिसांखली येथूनही वाहतुकीची सोय ठेवण्यात आली आहे.
इच्छुक ट्रेकर्सनी सोबत कपड्यांचा एक जादा जोड, रेनीवेयर, ट्रेकिंग शूज, खाद्यपदार्थ, दुर्बीण आणावी.धूम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही.
यासाठीचे शुल्क प्रती व्यक्ती 800 रुपये असून त्यात जेवण, प्रवास आणि गाइडच्या खर्चाचा समावेशआहे.
कृपया नोंद घ्यावी – शारीरिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्यांनी हा ट्रेक करू नये.
आरक्षणासाठी संपर्क : श्री. अनिल दलाल, जीटीडीसी – 9422057704/ 8379022215