जीटीडीसीचा पुढील पावसाळी ट्रेक रविवार 11 ऑगस्ट 2019 रोजी असोदे गावात
प्रेस रीलीज
जीटीडीसीचा पुढील पावसाळी ट्रेक रविवार 11 ऑगस्ट 2019 रोजी असोदे गावात
पणजी, 6 ऑगस्ट – गोवा पर्यटन विकास महामंडळाने मजामस्तीने भरलेला आणखी एक ट्रेक आयोजित केला असून हा ट्रेक रविवार 11 ऑगस्ट 2019 रोजी असोदे गावात जाणार आहे.
असोदे हे उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यात वसलेले एक छोटे गाव आहे. असोदे गावाला निसर्गाचे वरदान लाभले असून त्याभोवती भरपूर जंगले आहेत. शेती आणि दुग्धजन्य व्यवसाय हे गावकऱ्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहेत. असोदे गावातील घरांची संख्या 10 ते 12 असून एकूण लोकसंख्या 50 ते 60 लोकांची आहे. वाल्वोई ते असोदे गावापर्यंतचे अंतर केवळ 16 किलोमीटर आहे. गावाच्या कळसापाशी दोन धबधबे असून 20- 25 मिनिटे चालून तिथे पोहोचता येते.
हा ट्रेक सोपा तरीही साहसपूर्ण आहे. वाटेमध्ये छोटे ओहोळ, रंगीबेरंगी फुलपाखरं आणि निसर्गाचं सर्वोत्तम रूप पाहायला मिळतं. या ट्रेकदरम्यान काही ठिकाणी तीव्र चढ तसेच निसरड्या खडकांचं वर्चस्व आहे.
तेव्हा तुमची ट्रेकिंग बॅग भरा आणि या सोप्य तरीही साहसी ट्रेकदरम्यान निसर्गाची जादू अनुभवण्यासाठी चला.
हा ट्रेक सर्वांसाठी विशेषतः साहस आणि निसर्गप्रेमींसाठी खुला आहे.
वाहतुकीची सोय म्हापसा रेसिडेन्सी आणि पर्यटन भवनापासून सकाळी 7.30 वाजता आणि पाटो येथून 8.30 वाजता, तर मडगाव रेसिडेन्सीपासून सकाळी 7.15 वाजता करण्यात आली आहे. जुना गोवा, बाणस्थरी, पर्वरी, कोर्ताली आणि वेर्णा येथूनही वाहतुकीची सोय करण्यात आली आहे.
इच्छुक ट्रेकर्सनी सोबत कपड्यांचा एक जादा जोड, रेनीवेयर, ट्रेकिंग शूज, खाद्यपदार्थ, दुर्बीण आणावी. धूम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही.
यासाठीचे शुल्क प्रती व्यक्ती 800 रुपये असून त्यात जेवण, प्रवास आणि गाइडच्या खर्चाचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST