Friday, August 9, 2019

आंतरराष्ट्रीय मांजर दिन : शिवानी सुर्वेकडे आहेत तीन गोजिरवाणी मांजरं

आंतरराष्ट्रीय मांजर दिन : शिवानी सुर्वेकडे आहेत तीन गोजिरवाणी मांजरं

 

आंतरराष्ट्रीय मांजर दिन शिवानी सुर्वेकडे आहेत तीन गोजिरवाणी मांजरं
ऑगस्ट हा दिन आंतरराष्ट्रिय मांजर दिवस (International Cat Day) म्हणून जगभरात साजरा केला जातो. बिग बॉस कंटेस्टंट आणि अभिनेत्री शिवानी सुर्वेला  मांजरं खूप आवडतात. तिच्याकडे तीन गोंडस मांजरी आहेत. ही तीनही मांजरं तिच्या कुटूंबांचा एक महत्वपूर्ण हिस्सा आहेत. आणि ह्या छोटुकल्या कुटूंबियांना शिवानी बिग बॉसच्या घरात सध्या किती मिस करतेय, ते तिने काही दिवसांपूर्वीच बिग बॉसमधल्या अनसीन अनदेखा ह्या व्हिडीयोमध्ये सांगितलं आहे.

तिने ह्या व्हिडीयोत सांगितलंय, की माझ्या घरी पहिला तपकिरी रंगाचा बोका आला. ज्याचं नाव आम्ही ब्रुनो ठेवलं. त्यानंतर काळी-पिवळी, तपकिरी रंगाची मांजर आली . तिचं नाव माझ्या  आईने सखी ठेवलं. आणि नंतर पांढरी शुभ्र रंगाची मांजर आली. तिचं नाव स्नो आहे. गेम ऑफ थ्रोन्स मधला जॉन स्नो पाहून मी त्या मांजरांच नाव स्नो ठेवलं. प्रत्येक मांजराचे स्वभाव-आवाज वेगवेगळे आहेत. आणि तिघंही माझी खूप लाडकी आहेत.

शिवानीने आपल्या मांजरांच्या मस्तीचे किस्सेही ह्या व्हिडीयोत सांगितले आहेत. बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदरही तिने आपल्या मांजरांविषयीचा एक व्हिडीयोही रेकॉर्ड केला आहे. ती आपल्या मांजरांच्या आठवणी सांगते, माझी तिनही मांजरं माझ्या प्रत्येक प्रोजेक्टच्या सेटवर आली आहेत. मग ते मुंबई असो की पुणे, माझ्या प्रत्येक आउटडोअर सेटवर माझी मांजरं आली आहेत.  पण बिग बॉसच्या शोचा फॉरमॅट वेगळा असल्याने मी त्यांना माझ्यासोबत आणू शकले नाही. त्यामुळे त्यांना आता मी मिस करतेय

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...