Tuesday, November 6, 2018

दिवाळीदरम्यान पर्यटनासाठी गोवा ठरले पर्यटकांचे सर्वात पसंतीचे ठिकाण - ओयो

       गोव्याने सर्वात पसंतीचे हॉलिडे ठिकाण म्हणून मारली बाजी, त्यानंतर जयपूर, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, नैनिताल व उदयपूर यांचा क्रमांक
       गोव्यातील वार्षिक बुकिंगमध्ये 179%* वाढ (फूटर पाहा)
       गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीच्या कालावधीत एकंदर बुकिंगमध्ये 190% वाढ झाल्याचे ओयोचे निरीक्षण* (फूटर पाहा)
       यंदाच्या सणासुदीसाठी कलंगुट व बागा यांनी नोंदवली सर्वाधिक पर्यटक संख्या
       साऊथ गोव्याच्या तुलनेत नॉर्थ गोव्याला पर्यटकांची अधिक पसंती

दिवाळी उंबरठ्यावर आली असल्याने संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीमध्ये, लोक घरामध्ये लज्जतदार पदार्थ व मिठाई आणतात, त्याशिवाय कार्ड पार्टी व अन्य अनेक उपक्रमांचा आनंद घेतात. दिवाळी हा भारतातील अतिशय लोकप्रिय सण आहे, हे वेगळे सांगायला नको. पारंपरिक पद्धतीने, हा दिव्यांचा सण कुटुंबीयांना व मित्रमंडळींना एकत्र आणणारा असला तरी आता कालानुरूप त्याचे स्वरूप बदलते आहे. या वर्षी सणासुदीचा आनंद घेत असताना जोडपी व व्यक्ती यांच्यामध्ये नवा ट्रेंड दिसून येत असून, ते हॉलिडचा बेत आखण्यास पसंती देत आहेत.  

घरी थांबण्याऐवजी कुटुंबाबरोबर किंवा एकट्याने प्रवास करण्यासाठी लोकांचा कल वाढत असल्याचे आढळले आहे. हा ट्रेंड सुरू होण्याची विविध कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे, सुटीसाठी बरेच दिवस उपलब्ध असल्याचे लोकांच्या लक्षात आल्यावर प्रवासाची तीव्र इच्छा निर्माण होते. अशा वेळी, अनेक पर्यटनप्रेमी बॅग भरतात आणि आराम करण्यासाठी व ताजेतवाने होण्यासाठी एखाद्या ठिकाणाची निवड करतात. दुसरे कारण म्हणजे, राहण्याची दर्जेदार, सुंदर सोय सहज उपलब्ध असल्याने, नवनवीन साहस अनुभवण्यासाठी पर्यटक सरसावतात.  

ओयोने केलेल्या विश्लेषणानुसार, गोव्यामध्ये दिवाळीच्या कालावधीदरम्यान प्री-बुकिंगमध्ये वार्षिक 179% वाढ झाली आहे. पर्यटकांची सर्वाधिक पसंती गोव्याला असून तेथे सर्वाधिक बुकिंग केले जात आहे, तर त्यानंतर जयपूर, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, नैनिताल व उदयपूर यांचा क्रमांक लागतो. कलंगुट व बागा या ठिकाणांनी बाजी मारली असून, अधिकाधिक पर्यटकांनी तेथे यंदाची दिवाळी साजरी करण्याचे नियोजन केले आहे. तसेच, साऊथ गोव्याच्या तुलनेत नॉर्थ गोव्याला पर्यटकांची अधिक पसंती आहे, असे आढळले आहे.

याचबरोबर, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीच्या कालावधीसाठी एकंदर प्री-बुकिंगमध्ये 190% वाढ झाल्याचे ओयोचे निरीक्षण आहे. दिवाळी जवळ येत असल्याने हे प्रमाण अंदाजे 250% पर्यंत वाढू शकते, असे ओयोचे मत आहे. एकंदर बुकिंग ट्रेंड पाहता, सोलो ट्रॅव्हलमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आढळत आहे. दक्षिणय आशियातील या सर्वात मोठ्या हॉटेल साखळीने स्वतंत्र बुकिंगमध्ये तब्बल 110% वाढ झाल्याची माहिती दिली आहे, तर कपल बुकिंगमध्ये वार्षिक 96% वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीच्या संपूर्ण कालावधीमध्ये, पर्यटकांची राहण्यासाठी पसंती अधोरेखित करत, ओयोने बुकिंगमध्ये तब्बल 180% वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे.

सर्वात आकर्षक मुद्दा म्हणजे – हॉस्पिटॅलिटी कंपन्या प्रवाशांचे स्वागत करत आहेत आणि ग्राहकांना त्यांच्या घराप्रमाणे वाटावे, यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ओयो या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या व जगातील झपाट्याने वाढत्या हॉटेल साखळीने ओयो होम व ओयो टाउनहाउस असे पर्याय उपलब्ध केले आहेत आणि कुटुंबीय व मित्रमंडळी यांच्याबरोबर सणाचा आनंद घेत असताना खासगीपणाही राखला जाईल, याची काळजी घेतली आहे. 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...