Monday, November 19, 2018

पर्यटन विभागाने घेतली स्वच्छतेची जबाबदारी – जीटीडीसीच्या प्रोजेक्ट सेलच्या सहकार्याने समुद्रकिनाऱ्यांवर कामगार तैनात


•         उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सर्व महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांवर २०० कामगार तैनात
•         येत्या काही दिवसांत स्वच्छ होणार सर्व समुद्रकिनारे
•        कचरा गोळा करण्यावर आणि त्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्यावर मुख्य भर

पणजी१९ नोव्हेंबर – गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या प्रोजेक्ट सेलच्या मदतीने कालपासून पर्यटन विभागाने स्वच्छतेची पूर्ण जबाबदारी आपल्याकडे घेत राज्याच्या सर्व समुद्रकिनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावरस्वच्छता सुरू केली आहे.

शुक्रवारपासून २०० कामगार उत्तर  दक्षिण गोव्यातील महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी तैनात करण्यात आले आहेतपर्यटन विभाग येत्या काही दिवसांत कामगारांच्या उपलब्धतेनुसार इतरसमुद्रकिनाऱ्यांवरही स्वच्छता मोहीम राबवणार आहे.

गोवा टुरिझमने आज जारी केलेल्या निवेदनात स्वच्छतेचे कामकाज हाताळणाऱ्या दृष्टी लाइफसेव्हिंगचे निलंबन केल्यानंतर इतर विविध कंत्राटदारांना समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी त्यांचा कर्मचारीवर्ग उपलब्धकरत दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

पर्यटन विभाग कचरा गोळा करणेदुसऱ्या टप्प्यात त्याचे वर्गीकरण करणे यावर भर देत असून त्याची विल्हेवाट लावण्याचे कामही सुरू आहे.
समुद्रकिनाऱ्यांवरून गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव असून त्यानंतर तो सालिगाव येथील कचरा विघटन कारखान्यात पाठवला जाणार आहे.

कचरा गोळा करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट आहे,’ असे जीटीडीसीच्या प्रोजेक्ट सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेम्हणूनच समुद्रकिनाऱ्यांवर तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नंतर वर्गीकरणासंदर्भातमार्गदर्शन केले जाणआर आहेया संपूर्ण कामात सुसूत्रता  स्थैर्य आणण्यासाठी किमान एक ते दोन दिवसांचा कालावधी लागेल,’ असेही ते अधिकारी म्हणाले,

पर्यटन विभागाने पुढे असे सांगितले आहेकी समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता आता नियंत्रणात आली असून या कामात आणखी सुसूत्रता आल्यानंतर समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी नवी एजन्सी नेमण्यासाठी निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे काम अधिक सफाईदारपणे  प्रभावीपणे होईल.





No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...