Wednesday, November 14, 2018

बुटांवर प्रेम असणाऱ्या नवराज हंसकडे आहेत बुटांचे तब्बल १२०० जोड!
आपल्‍याला अनेकदा बॉलिवूड व टेलिव्हिजन सेलिब्रिटीबाबत विलक्षण गोष्‍टी ऐकायला मिळतात. घड्याळे, परफ्युम्‍स, कॅप्‍स, बॅग्‍ज असो ही यादी मुख्‍यत: महिलांसाठी कधीच थांबत नाही. पण आता या यादीमध्‍ये भर पडली आहे एका पुरुषाची, तो म्‍हणजे आपला लाडका पंजाब दा पुत्‍तर नवराज हंस. नवराजला शूजची खूप आवड आहे. त्‍याच्‍या या आवडीमुळेच त्‍याला शॉपिंगही फार आवडते. &TV वरील शो 'लव्‍ह मी इंडिया'मध्‍ये नॉर्थ झोनचा कर्णधार असलेला हा गायक विविध प्रकाराचे व आकर्षक शूज वापरताना दिसतो. त्याच्याकडे पिवळा, नारिंगी, लाल असे विविध प्रकाराचे रंग, विविध स्‍टाइल्‍स, विविध डिझाइन्‍स, विविध साहित्‍याचे शूज आहेत.
१२०० हून अधिक शूजचा मालक आणि शूज पुरूषाच्‍या स्‍टाइलमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करतात ही विचारसारणी असलेल्‍या नवराजला शूजची खूप आवड आहे. नवराज म्‍हणाला, ''माझ्याकडे शूजच्‍या १२०० जोड्या आहेत. यामध्‍ये ट्रेनर्स, स्‍नीकर्स, बूट्स, फॉर्मल आणि सेमीफॉर्मल शूजचा समावेश आहे. माझे ट्रेनर्सचे कलेक्शन माझ्या सर्वात आवडीचे आहेत. या शूजमधून माझ्या पोशाखाला साजेशी अशी स्टाइल आणि कम्फर्ट मिळतो. ''
शूज खरेदी करतेवेळी आपले विचार आणि शॉपिंगबाबतचे प्रेम व्‍यक्‍त करताना हा गायक म्‍हणाला, ''मी शूज खरेदी करताना नवीन स्‍टाइल किंवा काहीतरी वेगळ्या स्‍टाइलच्‍या शूजना प्राधान्‍य देतो. म्‍हणूनच मी कस्‍टम मेड किंवा उजळ रंगातील, दर्जा व स्‍टाइल असलेले शूज खरेदी करतो. माझ्या निवडीसाठी आणि मी ते कशाप्रकारे परिधान करतो यासाठी अनेकदा माझे कौतुक करण्‍यात आले आहे. म्‍हणूनच मी माझ्या शूजसह माझी स्‍टाइल बदलत राहतो. मला सतत चमकत राहावेसे वाटत असल्‍याने मी माझ्या पोशाखाला साजेसे असे सफेद व गोल्‍ड रंगामधील शूज परिधान करतो. मी हे शूज खासकरून लखनौमधील लव्‍ह मी इंडिया कॉन्‍सर्टसाठी परिधान केले होते. तसेच लव्‍ह मी इंडिया शूट्सदरम्‍यान देखील मी माझ्या आवडीच्‍या कलेक्‍शनमधून शूज परिधान करतो. याशिवाय मला जॅकेट्स व बॅग्‍सची देखील आवड आहे आणि माझ्याकडे त्‍यांचे देखील कलेक्‍शन आहे. माझ्याकडे जॅकेट्सचे १०० हून अधिक कलेक्‍शन आहे. पण शूजचे कलेक्‍शन सर्वात जास्त आहे. थोडक्‍यात मी पूर्णत: शॉपेहोलिक आहे.'' नवराज हसत म्‍हणाला.
अशा आवडीसह नवराज हंस नक्‍कीच बॉलिवुडमधील अनेक सेलिब्रिटींना टक्‍कर देईल. आपली स्‍टाइल अधिक उंचावर ठेवत नवराज हंस नॉर्थ झोनमधील स्‍पर्धकांना मार्गदर्शन करण्‍यास सज्‍ज आहे. हे स्‍पर्धक लवकरच 'लव्‍ह मी इंडिया'मधील प्रखर संगीत सघर्षाचा सामना करणार आहेत.

अधिक जाणण्‍यासाठी पाहत रहा 'लव्‍ह मी इंडिया' दर शनिवार व रविवार रात्री ९ वाजता फक्‍त &TV वर



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...