‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ कार्यक्रमात रिचा शर्माचा परीक्षक म्हणून प्रवेश, सोना मोहपात्राच्या जागी
अगोदरच पुष्कळ काम हातात असल्यामुळे सोना मोहपात्राने सोडले परीक्षकपद
‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ कार्यक्रमाची नवी आवृत्तीचे प्रसारण सुरू झाल्यानंतर आणि या कार्यक्रमातील अंतिम 15 स्पर्धक प्रेक्षकांपुढे आल्याच्या एका आठवड्यानंतर कार्यक्रमातीलएक परीक्षक व नामवंत पार्श्वगायिका सोना मोहपात्रा हिने या कार्यक्रमातून माघार घेतली आहे. आता तिच्या जागी बहुगुणी गायिका रिचा शर्मा हिची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यातआली आहे. सोना मोहपात्राने अपरिहार्य कारणांमुळे या कार्यक्रमाचा निरोप घेतला.
‘झीटीव्ही’च्याव्यवसाय विभागाच्या प्रमुख अपर्णाभोसले म्हणाल्या, “‘सा रे ग म प’ कार्यक्रमात अतिशय गुणी गायिका रिचा शर्मा हिची परीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आम्हालाअतिशय आनंद होत आहे. संगीताच्या क्षेत्रात तिचं काम पाहिल्यावर ती किती वैविध्यपूर्ण आणि गुणी गायिका आहे, ते दिसून येतं. बिल्लो रानी ते सजदा यासारख्या गाण्यांमधून तिचं गाणीकिती वैविध्यपूर्ण गटांतून फिरतं, त्याची झलक दिसून येते आणि त्यामुळेच ती किती अनोखी गायिका आहे, तेही सिध्द होतं. सोनाला या कार्यक्रमात फार काळ राहता आलं नाही आणि तिलात्यातून बहेर पडावं लागलं, याचं आम्हाला वाईट वाटतं. यातील स्पर्धकांना तिच्याकडून तिच्या घराण्याची गायकी शिकता आली असती. भविष्यात संधी मिळाल्यस तिच्याबरोबर पुन्हा कामकरायला आम्हाला आवडेल.”
सोना मोहपात्रा म्हणाली, “‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ कार्यक्रमाच्या यापुढील भागांमध्ये मला परीक्षकांच्या पॅनलवर काम करता येणार नसलं, तरी माझ्या जागी संगीत क्षेत्रातील माझीसर्वात आवडती आणि अतिशय गुणी, लाघवी गायिका रिचा शर्मा ही परीक्षकाचं काम बघणार आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. ही वाहिनी, हा कार्यक्रम आणि त्यातील स्पर्धकांनामाझ्या शुभेच्छा आणि हे स्पर्धक येत्या काही दिवसांत आपल्या अफलातून आवाजाने सर्वांचं मन जिंकतील, अशी मला आशा आहे. मला मात्र “#सोनाकाघराना”ची खूप आठवण येणार आहेआणि देशातील ही प्रतिष्ठेची स्पर्धा माझ्या टीममधले स्पर्धक जिंकतील, अशी मी आशा करते.”
रिचा शर्मा म्हणाली, “तरुण मुला-मुलींमधील गायनकलेचा शोध घेणारा ‘सा रे ग म प’ हा देशातील अग्रगण्य आणि सर्वात प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. गाण्यांविषयी झी टीव्हीवर सर्वप्रथम सुरूझालेल्या अंताक्षरी या रिअॅलिटी कार्यक्रमाची सूत्रसंचालक या नात्याने मी झी टीव्हीशी दहा वर्षांपूर्वी निगडित होते; तसंच ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमातही मी विशेष अतिथी म्हणून सहभागीझाले होते. शेखर आणि वाजिद यांच्याबरोबर आता याच कार्यक्रमात मला परीक्षक म्हणून काम पाहण्याची मिळालेली संधी हा माझा बहुमान आहे, असं मी समजते. मला सोनाबद्दल अतिशयआदर असून एक गायिका आणि एक व्यक्ती म्हणून मी तिचा खूप आदर करते. या कार्यक्रमातील तिच्या घराण्यासाठी तिने सर्वोत्तम स्पर्धक निवडले असतील, याबद्दल मला जराही शंकानाही. आता या स्पर्धकांमधील गायनकलेचा विकास करून त्यांना एक व्यावसायिक गायक बनविण्यासाठी मी त्यांना माझ्या परीने उत्तम मार्गदर्शन करीन.”
परीक्षकपदी नियुक्त झाल्याबद्दल रिचा शर्माला हार्दिक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST