Friday, November 23, 2018

Dear All,

Please find attached the &TV note and Pictures for your reference.

Marathi -


&टीव्हीच्या 'भाभीजी घर पर है' साठी अपरा मेहता आणि शुभांगी अत्रे 
तब्बल बारा वर्षांनंतर पुन्हा एकत्र
एकत्र कुटुंबीतील खुल्या विचारांची आधुनिक 'सासअसो किंवा एखादे खलनायकी नाहीतर करड्या छटेचे पात्र असोप्रेक्षकांना अखंडपणे खो खो हसायला लावण्याचे आव्हान असो किंवा एखादी कल्पनारम्य भूमिका विलक्षण सफाईने साकारून प्रेक्षकांना थक्क करणे असोछोट्या पडद्यावरील भूमिकांचा असा कोणताही साचा नाही जो टीव्ही क्षेत्रातील ज्येष्ठश्रेष्ठ अभिनेत्री अपरा मेहता यांनी हाताळलेला नाही२० वर्षांहून अधिक काळ रंगलेल्या आपल्या प्रदीर्घ टेलिव्हिजन कारकिर्दीमध्ये विविध प्रकारच्या मालिकांमध्ये असंख्य भूमिका केल्यानंतर अपरा मेहता आता आपल्या आवडीच्या प्रकाराकडे अर्थात विनोदी भूमिकेकडे परतण्यासाठी सज्ज झाल्या आहेत
आश्चर्य म्हणजे यानिमित्ताने अपरा आणि १२ वर्षांपूर्वीच्या ''क्यूं की सास भी कभी बहु थी '' या मालिकेतील त्यांची सहकलाकार अर्थात &TV वरील भाभी जी घर पर हैमालिकेतील सर्वांची लाडकी अंगूरी भाभी या दोघी छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेतगंमत म्हणजे शुभांगी यांनी तेव्हाच्या त्या गाजलेल्या कौटुंबिक मालिकेमध्ये शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण केले होतेत्यानिमित्ताने या दोघींमध्ये संवाद घडला होतात्या दिवसांच्या रंगीबेरंगी आठवणींबद्दल बोलताना शुभांगी म्हणाल्या, ''त्या मालिकेदरम्यान आम्ही एकाही प्रसंगात एकत्र नव्हतो मात्र पडद्यामागे मी त्यांच्याशी बोलल्याचं मला आठवतंतेव्हा त्यांनी मला विविध हावभावांबद्दल सांगितलं होतं तसंच अभिनयात सुधारणा करण्याच्या दृष्टीनेही काही सल्ले दिले होतेत्यानंतर बकुला बुवा का भूत या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान आमची दुसऱ्यांदा भेट झालीत्यावेळी अर्थातच पहिल्या भेटीची आठवण निघाली आणि आमच्यातलं अवघडलेपण दूर होऊन आम्ही भरपूर गप्पा मारल्याचं मला आठवतं. ''
अपरा यांच्याबरोबर पुन्हा एकदा काम करत असल्याचा आनंद व्यक्त करताना त्या म्हणाल्या''अपराजी या मालिकेमध्ये भूमिका करणार आहेत ही बातमी म्हणजे माझ्यासाठी आश्चर्याचा एक गोड धक्काच होतात्यांचे व्यक्तिमत्व खूप लाघवी आहे पण त्याचवेळी त्या कामाची शिस्तही काटेकोरपणे पाळतातकेवळ टेलिव्हीजन क्षेत्राचाच नव्हे तर रंगभूमीचाही अफाट अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत्यांच्या पावलांवर पाऊल ठेऊ पाहणाऱ्या माझ्यासारख्या कितीतरी अभिनेत्यांसाठी त्या प्रेरणास्थान आहेतइतक्या वर्षांनंतर भाभी जी घर पर है च्या निमित्ताने त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव नव्याने घ्यायला मी प्रचंड उत्सुक आहे.''
शुभांगी यांच्याबरोबर पुन्हा एकत्र काम करण्याबद्दलच्या आपल्या भावना मांडताना अपरा म्हणाल्या, ''मी आणि शुभांगीने एकमेकांसोबतच्या काही अशा मौल्यवान आठवणी जपून ठेवल्या आहेत ज्या केवळ एकत्र काम करण्यापुरत्या मर्यादित नाहीतशुभांगी ही टेलिव्हिजन क्षेत्रातील काही सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी आहे व तिच्या कामामधून तिचं हे नैपुण्य सतत दिसत आलं आहेआम्ही पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हापासून आजपर्यंत तिने केलेल्या प्रवासामध्ये तिच्यातील कलाकाराची उत्तम जडणघडण झाली आहेमी तर तिच्या अंगूरी भाभीची चाहती आहेतिने साकारलेलं हे पात्र आणि तिची शैली मला खूप आवडतेभाभी जी घर पर है च्या निमित्ताने तिच्याबरोबर पुन्हा एकदा काम करणं हासुद्धा एक जतन करून ठेवण्यासारखा अनुभव असणार आहे.''
अपरा मेहता यांनी भलेही अभिनयाचे सगळे प्रकार हाताळले असतीलपण विनोदी भूमिकांवरील त्यांच्या प्रेमाची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाहीयाच विषयावर बोलताना अपरा म्हणाल्या, ''एक कलाकार म्हणून गेली वीस वर्षे मी विविध भूमिका रंगवत आहे पण विनोदी भूमिका आपल्याला विशेष चांगल्या जमतात असं मला नेहमीची दिसून आलं आहेमाझ्याकडे आलेल्यामी साकारलेल्या काही भूमिका माझ्या गंमतीजंमती आवडणाऱ्याउत्साही व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विपरित होत्या.मला त्या साकारणं खूप आवडलं होतं यात शंकाच नाहीपण एखादी विनोदी भूमिका करताना माझ्या मूळच्या आनंदीप्रेमळ स्वभावाला वाव मिळतो हे ही तितकंच खरं.अर्थातकॉमेडी हाताळणं खूप आव्हानात्मक आहे असं मला अजूनही वाटतं आणि म्हणूनच विनोदी मालिका किंवा भूमिका स्वीकारताना मी अत्यंत चोखंदळपणे त्यांची निवड करतेमनाची पकड घेणारे कथानक मांडून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणं तसं सोपं आहे पण त्यांना मनसोक्त हसायला लावणं हे खरोखरीच कठीण आहेत्यासाठी पात्रं अत्यंत सुस्पष्टपणे चितारली जायला हवी आणि त्यांच्या जोडीला एक चांगली कथाही हवीघरातील महिलांचं लक्ष वेधणाऱ्या अनेक मालिका छोट्या पडद्यावर सुरूच असतात पण सगळ्या कुटुंबाला टीव्ही पाहण्यासाठी एकत्र आणण्याची ताकद केवळ विनोदी मालिकांमध्येच आहेभाभी जी घर पर है ही अशीच एक मालिका आहे ज्यात उत्तम कथासूत्रकुतुहल जागवणारे प्रसंग आणि अत्यंत गुणवान अभिनेते यांचा छान मेळ साधला गेला आहे. ''
या मालिकेमध्ये अपरा मेहता या अल्पा शहा नावाच्या एका गुजराती महिलेचे पात्र साकारणार आहेतयानिमित्ताने मॉडर्न कॉलनीच्या उत्तर भारतीय छाप असलेल्या वातावरणामध्ये गुजरातचे काही रंगढंग मिसळणार आहेत आणि आपल्या आणखी एका अनोख्या भूमिकेद्वारे अपरा छोट्या पडद्याला पुन्हा एकदा भुरळ पाडणार आहेत.
अधिक माहिती मिळविण्यासाठी पाहत रहा भाभीजी घर पर हैदर सोमवार ते शुक्रवार 
रात्री १०.३० वाजता फक्त &TV वर

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...