Wednesday, November 21, 2018

बॉक्सिंग आणि शास्त्रीय संगीताचं बांधलं जाणार आहे बंधन
कारण होणार आहे श्रुती-कार्तिक चं मनोमिलन

दिवाळीचा सण सरला आणि तुळशीचं लग्न लागलंकी सुरूवात होते लगीन सराईला... लग्न... एक असा सणज्यात दोन जीवांचं होतं मिलन... जितकीतयारी एखाद्या सणाची व्हावी त्याच्या दुपटीनेलग्नाची तयारी केली जाते... हीच लगीनघाई सध्या पाहायला मिळते आहे सोनी मराठीवर सुरू असलेल्यासारे तुझ्याचसाठी या मालिकेत... निमित्त आहे श्रुती-कार्तिकच्या लग्नाचं....

तसं पाहायला गेलं तर हे अरेंज मॅरेज... पण या दोघांमध्ये प्रेम कधी उमललं त्यांचं त्यांनाही नाही कळलंया दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर बॉक्सिंगच्याप्रेमाखातर श्रुतीने लग्नापुढे केलेली बॉक्सिंग ची निवड आणि त्यामुळे मोडलेला यांचा साखरपुडा... नव्याने फुलणाऱ्या या गोड नात्याला पूर्णविराम लागतोकी काय असं वाटत असतानाच कार्तिकच्या पुढाकाराने शेवटी हे सुत जुळलं... दुरावा सहन  झाल्याने कार्तिक ने श्रुतीच्या सरांना लग्नानंतर श्रुतीच्याबॉक्सिंगवर काहीही परिणाम होणारी नाहीअसं वचन देत लग्नासाठी परवानगी मिळवलीआणि तुळशीच्या लग्नानंतरचा पहिला मुहूर्त बघून आपल्यालग्नाचा बार उडवून द्यायचा निर्णय घेतला आहे.

लग्नाआधी मनाला लागणारी हूरहूर या दोघांच्या ही चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसते आहेदोन्ही कुटुंबांमध्ये आता लगीनघाई सुरू झाली आहे.गेल्या दोन-तीन महिन्यात एकमेकांसाठी निर्माण झालेली ओढ... त्या ओढीतून सहवासासाठी शोधली जाणारी वेगवेगळी कारणं ‘सारे तुझ्याचसाठी’ याकार्यक्रमाच्या शीर्षकाला अगदी तंतोतंत लागू पडत आहेतलग्नसोहळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आमंत्रणाचं...याला 20 तारखेपासून सुरूवात होणारआहे तर याच दरम्यान त्यांचं केळवण ही होणार आहे. 22 ला कार्तिकची बॅचलर्स पार्टी तर 23 ला मेंदीचा कार्यक्रम आहे. 24 ला हळद आणि 26 तारखेला हेदोन वेगळ्या ध्रुवावरचे जीव एकत्र येणार आहेत.

वेगळे स्वभाववेगळी व्यक्तीमत्त्वविरूध्द टोकाच्या आवडी जोपासणाऱ्या श्रुती – कातिर्कच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सोनी मराठीवर सुरू आहे.

बॉक्सिंगची शास्त्रीय संगीताशी बांधली जाणार आहे गाठ
म्हणूनच 26 नोव्हेंबर 2018 ला शाही लग्न सोहळ्याचा घातलाय घाट

तेव्हा बॉक्सिंगचा संगीताशी होणारा हा मेळ अनुभवायला... लग्नाला यायचंच!


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...