Tuesday, November 6, 2018

'दिल से दिल तक' अभियानांतर्गत हृदयदोष पीडित ३२० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया
वॉक्हार्ट फाउंडेशनचे हृदय पीडितांसाठी निधी उभारणी उपक्रमाचे आयोजन

मुंबई, ५ नोव्हेंबर २०१८ : वॉक्हार्ट फाउंडेशनने रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बेव्ह्यूच्या सहयोगाने, जन्मजात हृदयदोष असणाऱ्या बालकांवर उपचार करण्यासाठी फाउंडेशनच्या लिटल हार्ट्स उपक्रमांतर्गत 'दिल से दिल तक' या निधी-उभारणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या (सीडीसी) मते, दरवर्षी जन्माला येणाऱ्यांपैकी अंदाजे १०,००० बालकांमध्ये जन्मजात गंभीर हृदयदोष असतात. यापैकी अनेक केसेसच्या बाबतीत, जन्मापासून एका वर्षाच्या आत हार्ट सर्जरी करण्याची आवश्यकता भासते. दुर्दैवाने, त्यापैकी अनेकांचा असुविधा व जागृती यांच्या अभावाने मृत्यू होतो. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट, जन्मजात हृदयदोष असणाऱ्या समाजातील गरजू वर्गातील बालकांचे आयुष्य वॉक्हार्ट हॉस्पिटलच्या मदतीने वाचवणे. वॉक्हार्ट फाउंडेशनच्या लिटल हार्ट्स कार्यक्रमाने समाजातील वंचित वर्गातील ०-१५ वर्षे वयोगटातील जन्मजात हृदयदोष असणाऱ्या बालकांना आर्थिक मदत देण्याचे आणि त्यांचे जीवन वाचवण्याचे ठरवले आहे. आणि, म्हणूनच निधी उभारण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सरकार व मनोरंजन उद्योग यातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत झालेल्या निधी उभारणी कार्यक्रमामध्ये डॉ. राहुल जोशीज अँड इव्हॅल्युएशनने (तरुण म्युझिशिअन्सचा बँड) लाइव्ह परफॉर्मन्स केला. सौ. अमृता फडणवीस, अभिनेते-जॅकी भगनानी, महाराष्ट्राचे हौसिंग मंत्री-प्रकाश मेहता, भजन सम्राट-अनुप जलोटा, बीवायजेआयएम व आयबीजीएचे अध्यक्ष-मोहीत कम्बोज, डॉ. आदिती गोवित्रीकर-मिसेस वर्ल्ड २००१, अभिनेते-राहुल रॉय यांनी कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला.

वॉक्हार्ट फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विश्वस्त सर डॉ. हुझ (हुझैफा खोराकीवाला) यांनी लिटल हार्ट्ससाठी निधी उभारून त्यांचा वाढदिवस साजरा केला. डॉ. हुझ यांनी सांगितले, “जन्मजात हृदयदोष असलेल्या बालकांचे जीवन वाचवण्याच्या हेतूने लिटल हार्ट्सची सुरुवात करण्यात आली. आम्ही या उपक्रमांतर्गत ३२० यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असल्याचे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. आजचा निधी उभारणी उपक्रम म्हणजे या निष्पाप बालकांचा जीव वाचवण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. या अभियानाला पाठिंबा देण्यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे यावे व मदत करावी.”


कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर - शरद  लोहिया  यांनी सांगितले, "दिल से दिल तक हा आमचा निधी उभारण्यासाठी आयोजित केला जाणारा सर्वात मोठा उपक्रम आहे. जन्मजात दृदयदोष असणाऱ्या बालकांचे जीवन वाचवण्याबरोबरच, त्यांना नवे आयुष्य देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या आमच्या अतिशय यशस्वी निधी-उभारणी उपक्रमांपैकी एक असणाऱ्या या उपक्रमामध्ये करण्यात आलेल्या प्रतिज्ञा / बांधिलकी यांच्यामुळे या बालकांचे मौल्यवान जीवन वाचवले जाईल, याची शाश्वती निर्माण झाली आहे. या कार्यक्रमासाठी पाठिंबा देणारे डॉक्टर, मित्रमंडळी यांचे आम्ही ऋणी आहोत."



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...