Tuesday, November 6, 2018

कौटुंबिक मनोरंजन करणा-या 'लव्ह यु जिंदगी'चा टीजर लाँच

          तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा असणा-या अनिरुध्द दातेचा म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगीया आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झालाहा टीझर  प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळेसर्व वयोगटातील प्रेक्षकांना 'लव्ह यु जिंदगीच्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट आणि हटके विषयावर       भाष्य करणारा एक प्रवास अनुभवयाला मिळणार आहे.

         प्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे टीझरमध्ये दाखवण्यात आले असून सचिन पिळगांवकरप्रार्थना बेहरेकविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्सेया टीझरमध्ये पाहायला मिळतातविशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवी जोडी म्हणजेच
कविता लाड आणि सचिन पिळगांवकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.

         तसेच या चित्रपटाचा टिजर पाहिल्यावर हे लक्षात येते की सचिन पिळगांवकर साकारत असलेले सामान्य गृहस्थ अनिरुद्ध दाते हे पात्र यांचे वयाच्या बाबतीत फारच वेगळे मत आहेजसे की ते त्यांच्या वाढत्या वयाच्या सत्यालास्विकारण्यास तयार नसून आपण आजही ते तारुण्य अनुभवू शकतोत्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगू शकतो असे त्यांना वाटते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची असलेली धडपड चित्रपटात पाहायला मिळेलअसाहा विनोदीभावनात्मक आणि रोमांचकारी कथा असलेला चित्रपट अनेकांच्या नक्की पसंतीस उतरेल हे नक्की.

       दिग्दर्शक आणि सिनेनिर्मिते या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयोमर्यादा नसतेत्यासाठी गरजेचं असतं ते उत्साही मन आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठीलागणारं एक गोड धाडस.

        एस पी प्रोडक्टशन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बायगुडे यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केली असून कथा देखील त्यांनी लिहिली आहे.
कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट येत्या १४ डिसेंबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...