Saturday, November 17, 2018

सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न

थाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा

सर्व लाईन व्यस्त आहेतची गाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलानुकताच पार पडला संगीत प्रकाशन सोहळा

तगडी स्टारकास्टधम्माल विनोदी आणि भन्नाट मनोरंजन करणारा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’.  या चित्रपटाचे शीर्षक आपल्याला नविन नाहीदिवसातून अनेकदा आपण तेऐकतोपणया वाक्याशी निगडीत असलेला चित्रपट पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाची निर्मिती स्टेलारीया स्टुडीयोची असून अमोल उतेकर यांनी प्रस्तुत केला  आहेया मनोरंजक चित्रपटात  महेश मांजरेकरसिद्धार्थ जाधव,सौरभ गोखलेसंस्कृती बालगुडेस्मिता शेवाळेहेमांगी कवीनीथा शेट्टी-साळवीकमलाकर सातपुतेमाधवी सोमणप्रियंका मुणगेकरसंध्या कुटेसतीश आगाशेशिवाजी रेडकरहितेश संपतगौरव मोरे आदीकलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

एकंदरीत या चित्रपटाची कथा काय आहे हे लवकरच कळेलपण चित्रपट आणि प्रेक्षक यांना बांधून ठेवणा-या संगीताचा आज प्रकाशन सोहळा मुंबई येथील फोर सिझन हॉटेलमध्ये उत्साहात पार पडलाह्यादिमाखदार सोहळ्याला सिध्दार्थ जाधवसौरभ गोखलेसंस्कृती बालगुडेस्मिता शेवाळेनीथा शेट्टीसंगीतकार पंकज पडघनकोरिओग्राफर उमेश जाधवदिलीप मेस्त्रीएडिटर आशिष म्हात्रेडिओपी समीरआठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते

दिलाची तार’, गडबडे बाबा,  ‘येक नंबर’, ‘तू मोरपंखी’ आणि ‘या रे या रे नाचू सारे’ अशी एकूण पाच गाणी या चित्रपटात आहेत.  पंकज पडघनउद्भव ओझा यांनी या गाण्यांना संगीत दिले आहे तर गायक आदर्शशिंदेसौरभ साळुंखेअवधूत गुप्तेस्वप्नील बांदोडकरमधुरा पाटकरउद्भव ओझासागर फडकेअंकिता ब्रम्हे आणि रागिणी कवठेकर यांनी ही  गाणी गायली आहेत तसेच गीतकार श्रीकांत बोजेवारवलय यांनीलिहिली आहेत.  चित्रपटाची पटकथा आणि संवाद गणेश पंडीत आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली आहेत.





No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...