Monday, November 19, 2018

जीटीडीसीतर्फे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईतील कर्करोगग्रस्त लहान मुलांसाठी बोट क्रुझ सहलीचे खास आयोजन

पणजी१८ नोव्हेंबर – टाटा कॅन्सर रिसर्च मेमोरियल हॉस्पिटलमुंबई येथे कर्करोगावर उपचार घेत असलेल्या लहान मुलांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाने आयोजित केलेल्या मांडवी नदीवरील सँटा मोनिकायेथील खास क्रुझचा आनंद लुटला.

कर्करोग झालेल्या  त्यावर टाटा मेमोरियल हॉस्पिटलमुंबई येथे उपचार घेणारी २८ मुले गुरुवारी आपल्या पालकांसह मडगाव येथे तीन दिवसीय सहलीसाठी दाखल झाली.

सुट्टीचा एक भाग म्हणून त्यांनी देवळेचर्चसमुद्रकिनारे यांना भेट दिली आणि मांडवी नदीतील बोट क्रुझचा आनंद घेतला.

केंद्रीय मंत्री श्रीश्रीपाद नाईक यांच्या खास विनंतीवरून जीटीडीसीने या क्रुझचे आयोजन केले होते.

जीटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि पीआरओ दीपक नार्वेकर यांनी मुले  त्यांच्या पालकांचे सँटा मोनिकावर स्वागत केलेकेंद्रीय मंत्रीओएसडी श्रीसुरज नाईकजीटीडीसीचे सहाय्यक व्यवस्थापक – क्रुझएसश्रीसुरेंद्र सावंतजीटीडीसीच्या अधिकारी श्रीमती मनिषा शिरोडा आणि श्रीनिलेश नाईक देसाई यांनी याप्रसंगी उपस्थित राहून सँटा मोनिकावरील उपक्रमांचे समन्वय केलेटाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कर्मचारीआणि स्वयंसेवकही यावेळेस हजर होते.

श्रीमती स्वाती म्हात्रेज्युपीआरओ आणि श्रीसंतोष शेरवडेसहाय्यक प्रशासकीय अधिकारी पब्लिक रिलेशन्स टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचे इतर अधिकारीही यावेळेस उपस्थित होते.

मुलांसाठी जीटीडीसीने सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या.

जीटीडीसीचे अध्यश्र श्रीदयानंद सोपटे यांनी ही आपला पूर्ण पाठिंबा देत मुलांना आरामदायी आणि आनंदी वास्तव्याचा अनुभव घेता येईल याकडे पूर्ण लक्ष दिले.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...