Saturday, November 17, 2018


गोवा टुरिझमतर्फे भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेईकल पर्यटन उपक्रम लाँच

 पणजी१६ नोव्हेंबर २०१८ – माननीय पर्यटन मंत्री श्रीमनोहर आजगांवकर आणि जीटीडीसीचे माननीय अध्यक्ष श्रीदयानंद सोपटे यांनी आज पर्यटन भवनपणजी येथे भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेईकलपर्यटन उपक्रम लाँच केलायाप्रसंगी जीटीडीसीचे संचालक मंडळपर्यटन आणि जीटीडीसीचे अधिकारी  इतर मान्यवर उपस्थित होते.

गोवा पर्यटन विकास महामंडळाचा बी लाइव्ह’ हा इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्हीपर्यटन उपक्रम ‘अर्किस टुर्स प्रालियांच्याशी केलेल्या भागिदारीच्या माध्यमातून अमलात येणार असून तो शाश्वत पर्यटनाच्या दिशेनेमहत्त्वाचे पाऊल ठरेलयामुळे पर्यटकांना गोवा पर्यावरणपूरक आणि ट्रेंडी पद्धतीने नव्या माध्यमातून जाणणं  अनुभवणं शक्य होईल.

श्रीमनोहर आजगांवकरमाननीय पर्यटन मंत्रीगोवा सरकार म्हणाले, ‘अर्किस टुर्स प्रालियांच्या सहकार्यानेबी लाइव्ह’ हा भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेईकल पर्यटन उपक्रम जाहीर करताना आम्हालाअभिमान वाटत आहेशाश्वत पर्यटन हा आमच्या प्रयत्नांच्या गाभा असून भारतात ईव्ही यंत्रणा तयार करून इतरांसाठी आदर्श घालून देताना आम्हाला आनंद होत आहेपर्यावरणात सकारात्मक बदल घडवणारेतंत्रज्ञान आणि उद्योगांना आम्ही पाठिंबा तसेच चालना देतोदेशातील विविध पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमांचे नेतृत्व गोवा करत असून अर्किस टुर्स प्रालिबोरबर झालेली भागिदारी हे आमचे शाश्वत पर्यावरणसाध्य करण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहेठाम हेतू असलेले बरेच उपक्रम सादर केले जात असतातमात्र त्यामध्ये स्थानिकांना सक्षम करून सामाजिक भागिदारी सुधारण्याची क्षमता अभावानेच आढळूनयेतेबी लाइव्हद्वारे उपलब्ध केल्या जाणाऱ्या सहलींमध्ये स्थानिक समाजाचा सहभाग असल्यामुळे आमचे संबंध त्यांच्यासाठी जास्त अर्थपूर्ण ठरतील.’

गोवा पर्यटन विकास महामंडळ लिमिटेडचे (जीटीडीसीअध्यक्ष श्रीदयानंद सोपटे म्हणाले, ‘भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्हीपर्यटन उपक्रम – बी लाइव्ह लाँच करण्यासाठी अर्किस टुर्स प्रालि.शीभागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहेवाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाचा धोका आणि त्यामुळे गोव्याच्या वायू प्रदूषणात टाकली जात असलेली भर लक्षात घेता ईव्ही पर्यटन कार्बनचे प्रमाण कमीकरण्यासाठी भरीव मदत करेलहा क्रांतीकारी उपक्रम आहेजो पर्यटनाचा सखोल अनुभव घेतानाच प्रवासाची हरित साधने पुरवेलयामुळे स्थानिक समाज सक्षम होईल आणि आपल्या प्रत्येकासाठी हरित भविष्यघडवण्यास मदत होईल.’

अर्किस टुर्स प्रालिहे भारतात इलेक्ट्रिक व्हेईकल पर्यटनाचे प्रवर्तक आहेत आणि त्यांनी भारतातील पहिली ईव्ही पर्यटन यंत्रणा- ‘बी लाइव्ह’ उभारण्यासाठी जीटीडीसीशी भागिदारी केली आहेया उपक्रमामध्ये बाइकवरून भ्रमंती करत स्थानिक संस्कृतीइतिहास आणि गोव्याचा वारसा सहजपणे समजून घेता येईलया  बाइक्समध्ये अत्याधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली असून त्यात जीपीएस ट्रॅकर२५ किमी वेगदेण्यासाठी बॅटरीवर चालणारी मोटरजास्त सुरक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक डिस्क ब्रेक यांचा त्यात समावेश आहेपर्यटक तसेच स्थानिकांना आता गोवा जास्त हरित  प्रदूषित  करणाऱ्या मार्गांनी पाहाता येणार आहे.

बी लाइव्ह लाँच करण्यासाठी जीटीडीसीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोतप्रवासी वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि कोंडी गोव्यासाठी चिंतेचा विषय झाली होती आणि सहजपणे प्रचलित होऊ शकणाऱ्याशाश्वत पर्यावरण पद्धती वापरात आणणे गरजेचे होतेबी लाइव्हद्वारे आम्ही लोकांना प्रवासाची हरित साधने वापरत अस्सल स्थानिक अनुभव घेण्यासाठी मदत करत आहोतबी लाइव्हद्वारे दिल्या जाणाऱ्याप्रत्येक प्रयोगशईल सहलीमध्ये स्थानिक समाजाला सहभागी करून घेण्यात आले असून त्यामुळे पर्यटकांना अस्सल गोवन संस्कृतीचा आनंद घेता येईल,’ असे समर्थ खोलकरमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापकअर्किस टुर्स प्रालिम्हणाले.
या सेवेच्या तंत्रज्ञानाबद्दल अर्किस टुर्स प्रालि.चे सीओओ आणि सहसंस्थापक संदीप मुखर्जी म्हणाले, ‘बी लाइव्हचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापरबीलाइव्ह.कं.इन प्लॅटफॉ४मवर प्रवाशांनाडिजिटल करन्सी वापरून सहजपणे सहलीचे आरक्षण करता येतेवेब अपच्या मदतीने रायडर्सना सहलीशी संबंधित रियल टाइम माहिती दिली जातेबाइक्स अत्याधुनिक आणि प्रत्येक चार्जवर ५० किमीची रेंजदेणाऱ्या असून त्यात मल्टी इन्फो डिस्प्लेसाठी डिजिटल स्क्रीन्स आणि सुरक्षिततेसाठी डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेतआमचे कमांड सेंटर्स जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने रायडर्सवर देखरेख करतेयामुळे बीलाइव्हपर्यावरणपूरक आणि त्याचबरोबर देशातील सर्वात स्मार्ट पर्यटन बनते.’

तर वैशिष्ट्ये
• चार्जिंग पॉइंट्स आणि कम्युनिटी सेंटर्स म्हणून हब्ज हब हे स्मार्ट हब आहेज्यामध्ये मोफत वायफायपर्यटकांसाठी सेवा आणि गोव्याची इत्थंभूत माहिती असलेला गाइड या सुविधा देण्यातआलेल्या आहेत.
. सहली आणि भाडेशुल्कावर वापरण्यासाठी स्मार्ट आणि डिजिटल पद्धतीने कनेक्ट करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक सायकल्स प्रमुख पर्यटनस्थळी उपलब्ध करण्यात आल्या असून त्याद्वारे पर्यटकांच्यासुरक्षिततेवरही भर देण्यात आला आहे.
 खास तयार करण्यात आलेल्या प्रयोगशील सहली स्थानिक वाटाड्याच्या मदतीने गोव्याचा अस्सल आणि सखोल अनुभव देतील.
     टुर रेंटलबाइक भाडेतत्वावर घेऊन स्वशोधाच्या सहलीला जाता येईल  दरम्यान टेक प्लॅटफॉर्म ऑडिओ कमेंटरीद्वारे तुमची संगत करेलप्रत्येक ठिकाण हे जिओ फेन्स्ड असल्यामुळे तुम्हीसंबंधित प्रत्येक ठिकाणाच्या पुढे गेल्यानंतर कंटेट उपलब्ध करून देईलसहल आरक्षित करण्यासाठी लॉन ऑन करा http://blive.co.in/




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

A FLEA BY THE TREE: WHERE CULINARY DELIGHTS, BOUTIQUE TREASURES, AND STAR-STUDDED GLAMOUR CAME UNDER ONE ROOF

  A FLEA BY THE TREE: WHERE CULINARY DELIGHTS, BOUTIQUE TREASURES, AND STAR-STUDDED GLAMOUR CAME UNDER ONE ROOF SPEARHEADED BY TEJASWINI KOL...