Wednesday, November 14, 2018

प्रशांत दळवी- जिज्ञासा भोई- मुंबईच्या अनपेक्षित जिज्ञासाच्या प्रश्नावलीमुळे जजेस् ही कोड्यात

प्रशांत दळवी- जिज्ञासा भोई-

मुंबईच्या अनपेक्षित जिज्ञासाच्या प्रश्नावलीमुळे जजेस् ही कोड्यात

मुंबईच्या जिज्ञासाच्या प्रश्नावलीची जजेस् ना ही भिती...

मुंबईकर अनपेक्षित जिज्ञासामध्ये दिसून येतो एक वेगळाच स्पिरीट

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या स्पर्धकांमध्ये सध्या सुपर डान्सर महाराष्ट्र होण्यासाठी चांगलीच चुरस रंगली आहे. या सगळ्याच स्पर्धकांमध्ये नृत्यकौशल्याबरोबरच अजूनही काही कौशल्य आहेत ज्यामुळे हे एकमेकांपेक्षा वेगळे ठरत आहेत. आणि यांचं हेच वेगळेपण जजेस् बरोबरच प्रेक्षकांना ही भावतं आहे. आपल्या नावाला साजेशीअसंच वेगळेपण जपणारी जिज्ञासा... जिच्या नावातच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ती अगदी आपल्या नावाला साजेशी वागते. ९ वर्षांची ही चिमुरडी जजेस् ना ही  कोड्यात पाडेल असे प्रश्न सतत विचारत असते.

अवघ्या ३ वर्षात नृत्याला सुरूवात करणारी मुंबईची जिज्ञासा भोई तिचे गुरू प्रशांत दळवीसोबत या स्पर्धेत सहभागी झाली आहे. ती मंचावर आली की आज जिज्ञासा कोणत्या गाण्यावर परफॉर्म करणार यापेक्षा आज जिज्ञासा मंचावर येऊन कोणते प्रश्न विचारणार आणि आपण त्याला काय उत्तर देणार याचा विचार जजेस् करत असतात. जिज्ञासा मंचावर येताना तगडी प्रश्नावली घेऊन येते ज्याने जजेस् च्याही नाकी नऊ येतात. त्यामुळे जिज्ञासाला आता ‘अनपेक्षित जिज्ञासा’ हे नाव आपसूक पडलंय आणि हे परीक्षकांना देखील पटलंय. प्रश्नांचा गुलदस्ता स्वत: जवळ बाळगणारी ही जिज्ञासानृत्याचा देव समजला जाणाऱ्या प्रभु देवा यांच्या आगामी लक्ष्मी’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मुंबईमध्ये जो एक स्पिरीट आहे, जी एक बिनधास्त भावना आहे, तशीच भावना आणि तिच एनर्जी मुंबईकर जिज्ञासामध्ये दिसून येते आणि त्यामुळेच बिनधास्त, बेधडकपणे प्रश्न विचारण्याचा जिज्ञासाचा स्वभाव आहे. 

मुंबईची जिज्ञासा आपल्या अनपेक्षित प्रश्नांनी जजेस् ना पेचात पाडते आहे तर आपल्या नृत्यकौशल्यांनी त्यांच्याकडून कौतुकाची थाप देखील मिळवत आहे. आता सुपर डान्सर महाराष्ट्र हा किताब मिळवण्यासाठी जिज्ञासा अजून जिद्दीने, मेहनतीने तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तिच्या या प्रयत्नातून तयार झालेले कमालीचे नृत्य पाहण्यासाठी पाहत राहा सुपर डान्सर महाराष्ट्र फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

सुपर डान्सर महाराष्ट्र या मनोरंजनाच्या कार्यक्रमात लवकरच एका विशेष थीमच्या माध्यमातून विशेष नृत्य पाहायला मिळणार आहे आणि ती खास थीम म्हणजे 'महाराष्ट्राचे लोकनृत्य'. ही खास थीम असलेल्या विशेष भागात गायक आनंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी ओळख निर्माण करणा-या आनंद यांनी आतापर्यंत हजारच्या वर गाणी गायली आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची गाणी नेहमीच हिट ठरली आहेत. आनंद शिंदेची गाणी प्रत्येकाला ठेका धरायला भाग पाडते. आनंद शिंदे यांच्या उपस्थितीत छोट्या उस्तादांनी 'महाराष्ट्राचे लोकनृत्यया थीमवर आधारित सर्वांचे लक्ष नक्कीच वेधून घेईल असे एका पेक्षा एक नृत्य सादर करणार आहेत. आपले नृत्यकौशल्य दाखवणा-या छोट्या उस्तादांनी आनंद शिंदे यांच्यासोबत भरपूर धमाल देखील केली आहे आणि विशेष म्हणजे जिज्ञासाच्या स्वभावामुळे आणि नृत्यकौशल्यामुळे आनंद शिंदे तिचे फॅन बनले आहेत, असेही त्यांनी या कार्यक्रमात सांगितले.  
आनंद शिंदे यांची उपस्थिती असलेल्या विशेष भागातील सर्व धमाल, मस्ती, कमाल नृत्य अनुभवण्यासाठी पाहत राहा  सुपर डान्सर महाराष्ट्र फक्त सोनी मराठीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...