Wednesday, November 14, 2018

स्त्री विरुध्द चेटकिणीचा मायाजाळ!
प्रेमाच्या या निरंतर लढ्यात सियाचे प्रेम वरचढ ठरेल की मोहिनीचे पछाडलेपण?
v झी टीव्हीवरील मनमोहिनीमध्ये रेहना पंडित, अंकित सिवच आणि गरिमासिंह राठोड यांच्या प्रमुख भूमिका
झी टीव्ही लवकरच प्रेक्षकांना एका कल्पनारम्य विश्वात घेऊन जाण्यासाठी मनमोहिनी ही नवी फॅण्टसी मालिका प्रसारित करणार आहे. तिचा कथा प्रामुख्याने निरंतर प्रेम, सूड, लालसा, पछाडलेपण आणि यासारख्या टोकाच्या भावनांशी निगडित आहे. वाळूचा प्रत्येक कण जिथे एक कथा सांगतो, अशा राजस्थानच्या मरूभूमीत या मालिकेची कथा घडते. मनमोहिनी नावाच्या एका अतृप्त आत्म्याची (चेटकिणीची) ही कथा असून ती गेली 500 वर्षे तिचा प्रियकर राम याच्याबरोबर मीलन घडण्यासाठी आसुसलेली असते. ती आता परतते आणि राम त्याची पत्नी सिया यांच्या जीवनाला घेरून टाकते. त्यात सियाच्या रामावरील विशुध्द आणि निखळ प्रेमाचा मोहिनीच्या आसुरी शक्तीविरुध्द होणार््या झंझावाती संघर्षाचे चित्रण आहे. रेहना पंडित, अंकित सिवच आणि गरिमासिंह राठोड हे कलाकार यात प्रमुख भूमिकेत आहेत.
रूपसुंदर रेहना पंडित ही यात मोहिनीची भूमिका साकारीत असून आपल्या भूमिकेतून आपण चेटकिणीची व्याख्याच बदलून टाकण्याचा प्रयत्न करू, असे ती सांगते. सामान्यत: चेटकीण म्हटली की एक भयावह आणि हिडीस व्यक्तीरेखा आपल्या डोळ्यापुढे उभी राहते. पण मोहिनी ही तशी अजिबात नाहीये. किंबहुना ती अतिशय सुंदर, आकर्षक आणि शक्तिशाली असून तिचं मन रामाविषयीच्या प्रेमाने पछाडलेलं असतं. तिला रामाची लागलेली ओढ ही वेडेपणाच्या मर्यादेपर्यंत गेलेली असली, तरी वेगळ्या अर्थाने आकर्षकही आहे. हे सर्व घटकांमुळे मी या भूमिकेकडे आकर्षित झाले आणि चेटकिणी आणि त्यांची चेटूकविद्या छोट्या पडद्यावर साकार करण्यास मी उत्सुक झाले आहे,” असे ती सांगते.
रामाची भूमिका रंगविणार््या देखण्या अंकित सिवचने सांगितले की मनमोहिनी मालिकेत प्रेमाची आणि प्रेमाच्या झपाटलेपणाची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर येईल. गूढ, रहस्य, प्रेम, अमानवी शक्ती आणि मुख्य म्हणजे मनाची जबरदस्त पकड घेणार््या कथानकाद्वारे मनमोहिनीमध्ये प्रेमाची जादू टाकलेली दिसेल. माझी रामाची व्यक्तिरेखा ही मोहिनीच्या प्रेमाच्या सापळ्यात अडकलेली असून त्यामुळे त्याचं जीवनच बदलून जातं. ही भूमिका रंगविण्याच्या कल्पनेमुळे मी आनंदित असलो, तरी दुसरीकडे मनातून काहीसा साशंक आणि अधीरही झालो आहे,” असे अंकित सांगतो.
सौंदर्यवती गरिमासिंह राठोड ही या मालिकेतील सियाच्या भूमिकेद्वारे टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण करीत आहे. टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण करण्यासाठी मलामनमोहिनीसारखी मालिका आणि सियासारखी भूमिका मिळावी, यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट कोणती असू शकते! या मालिकेकडून माझ्या बर््याच अपेक्षा आहेत. मी साकारणारी सिया ही एक साधसुधी मुलगी असून तिचं तिचा पती राम याच्यावर निरतिशय प्रेम असतं. त्यामुळे मोहिनीच्या दुष्ट प्रभावापासून रामाला वाचविण्यासाठी ती कोणत्याही टोकाला जाऊ शकते. ही भूमिका उभी करण्यासाठी मी घेतलेल्या मेहनतीची दखल प्रेक्षक घेतील आणि मला या भूमिकेत पाठिंबा देतील, अशी आशा आहे,”  असे गरिमाने सांगितले.
बहुप्रतीक्षितमनमोहिनीचे प्रसारण लवकरच झी टीव्हीवाहिनीवरून केले जाईल.









No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...