Wednesday, November 14, 2018

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’च्या सेटवर रीहान रॉय जखमी

‘झी टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेतील इन्स्पेक्टर पर्वच्या भूमिकेत रीहान रॉयने प्रेक्षकांची मने काबीज केली आहेत. सध्या मालिकेत दिवाळीनिमित्त विशेष कथाभाग सुरू असून त्यात मालिकेची नायिका गुड्डन ऊर्फ कनिका मान आणि खलनायकी भूमिकेतील इन्स्पेक्टर पर्व यांच्यातील संघर्ष चांगलाच विकोपाला गेल्याचे दिसून येते. हा संघर्षाचा प्रसंग रंगविताना अभिनेता रीहान रॉय मात्र जखमी झाला.
गुड्डनला मानसिक त्रास देण्यासाठी तिच्या बहिणीबरोबर आपले अनैतिक शारीरिक संबंध असल्याची बतावणी करण्यासाठी इन्स्पेक्टर पर्व जिंदाल हाऊसमध्ये जातो. त्याचे बोलणे ऐकून संतापलेली गुड्डन त्याच्यावर जळता दिवा फेकून मारते, असा हा प्रसंग होता.
हा प्रसंग दिवाळीच्या दिवसांमध्ये घडणार असल्याने विजेच्या दिव्यांऐवजी तेलाचे दिवे लावावेत अशी सूचना स्वत: रीहाननेच दिग्दर्शकाला केली होती. पण हा खरा दिवाच आपल्या त्रासाला कारणीभूत ठरेल, याची त्याला तरी कुठे कल्पना होती? सुदैवाने निर्मात्यांच्या टीमने सर्व खबरदारी आधीच घेतलेली असल्याने एक मोठा अपघात टळला. या प्रसंगाबद्दल रीहान म्हणाला, “प्रसंग उत्कृष्ट उभा राहण्यासाठी एका अभिनेत्याला थोडीफार जोखीम उचलावीच लागते. या प्रसंगात खरोखरचा वात असलेला दिवा वापरावा, अशी सूचना मीच दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या टीमला केली होती. कोणताही प्रसंग हा शक्य तितका वास्तववादी पध्दतीने साकारावा, अशी माझी इच्छा असते. अर्थात कोणताही अपघात होऊ नये, याची सर्व खबरदारी घेतलीच पाहिजे. या प्रसंगात मी काहीसा जखमी झालो हे खरं, पण हा प्रसंग जसा उभा राहिला आहे, ते पाहता या जखमेची वेदना रास्त होती, असं मला वाटतं.”
ज्याचा शेवट गोड, ते सारेच गोड! या दिवाळी विशेष भागातील नाट्यमय संघर्षपूर्ण प्रसंग पाहण्यास चुकवू नका!


पाहा ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...