Wednesday, November 21, 2018


नवीन वर्षात 'लव्ह यु जिंदगीम्हणत पाहायला मिळणार सचिन पिळगांवकर आणि कविता लाड यांची नवी जोडी

प्रेम जरी आयुष्यावर असलं तरी त्याची परिभाषा ही वयोगटानुसार वेगळी असते आणि अनिरुध्द दातेची तारुण्य पुन्हा एकदा जगण्याचीइच्छा हे सर्व आपण 'लव्ह यु जिंदगीया मराठी चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहिले आहेटीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद देखील दिलाहोतापण प्रेक्षकांच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम हटके आणि इंटरेस्टिंग करण्यासाठी हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीसयेणार आहे.

'लव्ह यु जिंदगी’ मध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर यांची प्रमुख भूमिका आहे आणि त्यांच्या सोबतीला अभिनेत्री कविता लाड आणिप्रार्थना बेहरे देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेतया चित्रपटाच्या निमित्ताने हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करतआहेतआणि नुकतेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये त्यांचा नवा लूक आपण पाहू शकतोतसेच कविता लाडआणि सचिन पिळगांवकर यांची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच अनुभवयाला मिळणार आहेइतकंच नव्हे तर कविता लाड आणि प्रार्थनाबेहरे देखील पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

कविता लाड यांनी प्रत्येक मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांच्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेतप्रेक्षकांनी देखीलत्यांच्या प्रत्येक भूमिकेला मनापासून प्रतिसाद दिला आहेपण  नवीन वर्षात 'लव्ह यु जिंदगीमुळे कविता लाड यांची नवी भूमिका आणितिघांचीही पहिल्यांदाच जुळून आलेली ऑन-स्क्रिन केमिस्ट्री पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

एसपीप्रोडक्शन्स  प्रस्तुतसचिन बामगुडे निर्मित 'लव्ह यु जिंदगीया कौटुंबिक मनोरंजन करणा-या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोजसावंत यांनी केले असून हा चित्रपट ११ जानेवारी २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...