Friday, November 23, 2018

सुपरहिट मल्याळम ‘अंगमली डायरीझच्या मराठी रिमेकमध्ये दिसणार भूषण पाटील

एका प्रादेशिक भाषेतील चित्रपटाचा रिमेक दुस-या प्रादेशिक भाषेत होणे हे कौतुकाचं आहे कारण यामुळे एखादी सुंदरमनोरंजक आणि वेगळेपण जपणारी कलाकृती अथवा चित्रपटजास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यास सोपे होते.

मल्याळम भाषेत सुपरहिट ठरलेल्या ‘अंगमली डायरीझ’ या चित्रपटाचा मराठी रिमेक बनवण्यात आला आहे.  ‘कोल्हापूर डायरीझ’ या मराठी रिमेक मधील अभिनेता भूषणनानासाहेब पाटीलच्या लूकची झलक डिजीटल मिडीयाच्या माध्यमातून नुकतीच दाखवण्यात आली आहेअवधूत गुप्ते प्रस्तुत ‘कोल्हापूर डायरीझ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जोराजन यांनी केले आहे.

मूळचा धुळेचा असणारा भूषण नानासाहेब पाटील याने १८ नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस साजरा केला आणि त्याच्या वाढदिवसाच्यादिवशी भूषणला डिजीटल मिडीयावर प्रदर्शितझालेला त्याच्या नव्या चित्रपटातील नवा लूक हे खास सरप्राईज मिळाले.  हे सरप्राईज जसे भूषणसाठी खास होते तसेच ते प्रेक्षकांसाठी देखील खास ठरले आणि भूषणच्या नव्यालूकला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याचा वाढदिवस अजून स्पेशल बनला.

सुपरहिट ठरलेल्या मल्याळम चित्रपटाच्या ‘कोल्हापूर डायरीझ’ या मराठी रिमेकमध्ये भूषण प्रमुख भूमिकेत दिसणार असून आता त्याच्या लूकची चर्चा होणार आणि प्रेक्षकांचीउत्सुकता देखवील वाढणार हे नक्की.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...